झोप येण्यासाठी घरगुती उपाय

मनात वेगवेगळे विचार येण्यामुळे बऱ्याच जणांना रात्री शांत झोप लागत नाही; पुरेशी झोप न झाल्यामुळे दिवसभर चिडचिड होत राहते, कामात लक्ष लागत नाही, कामाच्या ठिकाणी आळस येतो. म्हणूनच आज आपण शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चांगली झोप येण्यासाठी आपल्या झोपायच्या ठिकाणी शांतता असणे गरजेच आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री झोपायच्या आधी मोबाईल वापरायची सवय असते.

रात्री झोपायच्या आधी मोबाईल वापरल्याने आपल्याला लवकर चांगली झोप लागत नाही म्हणूनच झोपायच्या 30 मिनिटे आधी मोबाईल वापरू नका. रात्री झोपायच्या किमान अर्धा तास आधी चहा, कॉफी अशा गोष्टींचे सेवन करू नका.

रात्री झोपायच्या किमान 2 तास आधी जेवण करा. जेवणामध्ये पचायला हलक्या असणाऱ्या गोष्टींचाच समावेश असू द्या. रात्रीचे जेवण केल्यावर शतपावली करा. अन मग आपल्या तळपायांना नारळाचे तेल लावा. असे केल्याने आपल्याला लवकर आणि चांगली झोप लागेल.

झोपायच्या आधी दीर्घ श्वास घेणे, आवडते संगीत ऐकणे अशा गोष्टी आपण करू शकता. या उपायांनी आपल्याला झोप न आल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा अन मग झोपा. झोपायच्या आधी अंघोळ केल्याने आपल्याला शांत झोप लागेल.

ताण तणाव असल्यास चांगली झोप लागत नाही त्यामुळे झोपायच्या आधी आपल्या डोक्यात कोणताही विचार नसला पाहिजे. आपल्याला झोप येण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page