यूरिक एसिड पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव वेगवेगळे कार्य करत असतो. जेव्हा काही कारणांमुळे जेव्हा आपल्या शरीरातील हे अवयव काही कारणास्तव योग्यरित्या काम करू शकत नाही, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

कि’डनीचे कार्य शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचे असते आणि जेव्हा हे कार्य करण्याची किडनीची क्षमता कमी होते तेव्हा युरिया ऍसिड शरीरात जमा होऊ लागते.

वाढलेले यू’रिक एसिड हाडांमध्ये जमा होऊ लागते आणि त्यामुळे तुम्हाला यूरिक एसिडची लक्षणे जाणवू लागतात. बऱ्याचदा किडनी निकामी झाल्यामुळे, आहारात जास्त प्रमाणात प्युरीन असल्यामुळे, जास्त प्रमाणात म’द्यपान केल्याने, थायरॉईडचे प्रमाण जास्त किंवा कमी असल्याने, लठ्ठपणा यामुळे यूरिक एसिड हाडांमध्ये जमा होऊ लागते.

युरीक एसिड प्रमाणाच्या बाहेर वाढल्यास सांध्यामध्ये प्रचंड वेदना व्हायला लागतात, हालचाल करणे हि कठीण होऊन जाते. हातापायांना गाठी येतात.

आपल्या शरीरात युरीक एसिडचे वाढले असल्यास आपण तत्काळ मांसाहार करणे थांबवले पाहिजे. युरिक एसिडची पातळी कमी करण्यासाठी चेरी नावाचे फळ आपण खाऊ शकता.

आपल्या शरीरातील युरिक एसिडची पातळी कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन करा. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मामुळे यूरिक ऍसिडची पातळी कमी व्हायला मदत होते.

कोमट पाण्यासोबत एक चमचा अँपल सायडर व्हिनेगर मिसळून दिवसातून दोन वेळा दोन आठवडे सतत सेवन केल्याने युरिक ऍसिडची पातळी कमी होते. ओव्याचे पाणी प्यायल्याने देखील युरिक ऍसिडची पातळी कमी व्हायला मदत होते.

युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी एक कच्ची पपई घेऊन मधोमध कापून बिया वेगळ्या करा. त्यानंतर पपईचे तुकडे 2 लिटर पाण्यात 5 मिनिटे उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि दिवसातून २ ते ३ वेळा प्या. दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने यूरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.

शरीरातील युरीक एसिड पातळी नियंत्रणात राहण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या, पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर टाकले जातात. रात्री जागरण करू नका, पुरेशी झोप घ्या, आहारात साखरेचे प्रमाण कमी करा,

आपल्याला यूरिक एसिड पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी आमचे फेसबुक लाईक/ फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page