२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख

प्रतापराव गुजर यांचे धाकटे चिरंजीव सिधोजी गुजर यांनी १६९० पुढे काम करून मराठा आरमार स हातभार लावला. त्याकाळी कान्होजी आंग्रे पण मराठा आरमार मध्ये कार्यरत होते. सिधोजी गुजर पुन्हा देशावर निघून गेले आणि कान्होजी कडे आरमार एकटवले.

सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व सिद्दीने जिंकलेले केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून परत घेतले. राजारामां महाराजांनी त्यांची खुश होऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला. सन १६९६ मध्ये कान्होजींनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर कान्होजी नी आपले इमान राखले.

औरंगजेबच्या मृत्युनंतर मोगलांनी शाहूं महाराज सुटका केली. शाहूंनी सन १७०७ साली स्वतःस राज्याभिषेक केला. त्या दरम्यान ताराबाई व संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांच्यामध्ये गादीबद्दल भांडण सुरू झाला.

ताराबाई ची बाजू घेऊन कोकणात कान्होजी शाहू महाराजांना प्रवेश करू दिला नाही. एकदा तर कान्होजी ने शाहू महाराजांचे पेशवे बहिर्जी पिंगळे यांना कैद केले.

पण बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्दी पणाने त्यांची सुटका केली शिवाय कान्होजींना शाहू महाराज कडे वळवले. शाहू महाराजांनी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यास दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले फेब्रुवारी १७१४ अखेरपर्यंत छत्रपती शाहूंकडे प्रामाणिक राहिले.

कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून ते त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन सिद्दी , मुघल, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस देत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी संयुक्तरीत्या कान्होजींवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला.

आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास परवाना घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले.

कान्होजींनी पंढरपूर, आळंदी, जेजुरी आदी अनेक देवस्थानांना इनाम तसेच पैसे दिल्या. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी बंदर बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. त्यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी असे सहा मुलगे होते.

कान्होजी च्या मृत्यू नंतर सेखोजी आरमार प्रमुख झाले. पराक्रमी सेखोजि ने सिद्दीचा चांगलाच बंदोबस्त केला होता. छत्रपती आणि पेशवे या दोघांबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांनी मराठ्यांच्या आरमाराचा विकास केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने यावर कळस रचला गेला. कान्होजी आंग्रेंनी इंग्रज व पोर्तुगिजांची अनेक आक्रमणे परतवून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठी स्वराज्याचे रक्षण केले.

कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू मिती आषाढ वद्य ५ शके १६५१ दिनांक ४ जुलै १७२९ रोजी झाला. कान्होजी आंग्रे हे मनाने निर्मळ होते. स्वधर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती. त्यांच्या सैन्यात यवन सरदारही होते. त्यांचे न्याय फैसले अत्यंत नि:पक्षपाती होते.

त्यांनी एकूण ३६ वर्ष राज्य कारभार केला. ६० वर्ष त्यांना आयुष्य लाभले. उत्पन्न वाढवून त्यांनी राज्याला फायदा करुन दिला. प्रेम, वात्सल्य व ममता देऊन जनतेला सांभाळले.

Leave a Comment

You cannot copy content of this page