व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे

आपल्याला नेहमी थकवा जाणवतो का? सतत आळस येतो, कोणतेही काम करायला उत्साह वाटत नाही असे तुमच्याबरोबर होतय का? आपण सर्वात आधी तुम्ही व्हिटॅमिन बी12 ची चाचणी करून घ्या.

व्हिटॅमिन बी 12 चाचणी ही एक रक्त चाचणी असते; जी आपल्या रक्तातील व्हिटॅमिन बी 12 चे स्तर मोजते. शरीरातील रक्तपेशी आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असत.

व्हिटॅमिन बी 12 शरीराला अनेक धोकादायक आजारांपासून वाचवण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी12 अत्यंत आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी12 शरीरात फॉलिक असिड वाहून नेण्यास देखील मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आपण शरीरात व्हिटामिन बी 12 कमतरतेची लक्षणे कोणती असतात हे जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे भूक कमी होते; आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या देखील होऊ शकतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपैकी एक म्हणजे एनिमिया. महत्त्वाची बाब म्हणजे वेळेवर निदान झाले नाही तर त्यामुळे येणारा अशक्तपणा रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी असे आजार होऊ शकतात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्यामुळे हातपायांमध्ये मुंग्या येऊ शकतात; एका जागेवर जास्त वेळ बसल्यावर हात पाय बधीर होऊ शकतात.

ज्यांना व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे ते निरोगी व्यक्तीपेक्षा लवकर तणाव किंवा चिंताग्रस्त होऊ शकतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश हा गंभीर आजार होण्याचा देखील धोका असतो. ह्या आजारामध्ये रुग्णाची मानसिक स्थिती चांगली राहत नाही आणि तो विचार करू शकत नाही आणि समजू ही शकत नाही.

शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर ग’र्भवती महिलांमध्ये ग’र्भपात होण्याचा धोका असतो. गर्भवती महिलांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असल्यास बाळाचा योग्य विकास व्हायला समस्या येऊ शकतात.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. तसेच आपल्याला झालेल्या जखमा भरण्यास विलंब होऊ शकतो. यासोबतच नखांसह अनेक अवयवांमध्ये पिवळसरपणा दिसून येतो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तोंडात आतल्या बाजूने फोड येतात, त्वचा पिवळी पडते, नजर कमजोर होऊ शकते.

आपल्याला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत त्यामुळे फेसबुक पेज लाईक करून ठेवा. तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत आहोत.

आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरु करा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page