विटामिन बी12 कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला विविध सूक्ष्म पोषक घटकांची आवश्यकता असते. आज आपण अशाच एका आवश्यक पोषक घटकाबद्दल जाणून घेणार आहोत; निरोगी आरोग्यासाठी महत्वपूर्ण असणारी माहिती नियमित वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा.

आज आपण ज्या महत्वाच्या पोषक घटकाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे विटामिन बी12 याआधीच्या लेखात आपण विटामिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे जाणून घेतली आहेत; आता आपण शरीरातील विटामिन बी12 कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेचा रंग फिकट पडतो, हाता पायांना मुंग्या येऊ शकतात, अशक्तपणा येऊ शकतो, स्मरणशक्ती कमी होऊ शकते, मानसीक आजार होऊ शकतात, नजर कमजोर होऊ शकते.

सांधेदुखी होऊ शकते, थोड काम केल तरी थकवा येऊ शकतो जर आपल्या शरीरात विटामिन बी12 ची कमतरता असेल तर अशी लक्षणे दिसू शकतात. विटामिन बी12 हे मुख्यत प्राणीज अन्नामध्ये आढळते, त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये त्याची कमतरता आढळून येते.

मात्र आज आपण असे काही अन्न पदार्थ जाणून घेणार आहोत ज्यांच्या आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर आपण विटामिन बी12 ची कमतरता दूर करू शकता.

आपल्या रोजच्या आहारात दही, ताक, पनीर, दुध, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने आपण विटामिन बी12 ची कमतरता दूर करू शकता. याशिवाय सोयाबीन, तीळ गाजर, बीट यामध्ये देखील विटामिन बी12 आढळून येते.

आहारात शेंगदाणे, बदाम, अंजीर यांचा समावेश केल्याने आपण आपली दररोजची विटामिन बी12 ची गरज पूर्ण करू शकता याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये अल्प प्रमाणात विटामिन बी12 असते.

आपण त्यांचा देखील आपल्या आहारात समावेश करू शकता. तसेच आपल्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकता. आपण मांसाहार करत असल्यास अंडी, मटन, मासे यामधून आपल्याला विटामिन बी12 मिळू शकते.

आपल्याला विटामिन बी12 कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, व्हिटॅमिन बी12 कमतरता लक्षणे जाणून घ्यायचे असल्यास तसे कमेंट करून सांगा; आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत.

आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरु करा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page