ह्या विटामिनच्या कमतरतेमुळे आपल्याला रात्री झोप येत नाही?

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची असते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण रोज कमीतकमी 7-8 तास झोप घेणे गरजेच असत. पण काही लोकांना रात्रभर नीट झोप येत नाही. ते रात्रभर झोप येण्याची वाट बघत ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत राहतात. रात्री झोप कमी होण्याला निद्रानाश असे म्हणतात.

रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात जसे कि आपण ज्या खोली मध्ये झोप घेत आहात त्या खोलीचे तापमान, खोली मध्ये असणारी प्रकाश व्यवस्था, रात्री जेवण न केल्यामुळे सुद्धा आपल्याला झोप येत नाही. या बरोबरच आपल्या शरीरात विटामिन डी ची कमतरता असल्यास देखील आपल्याला रात्री चांगली झोप येत नाही.

व्हिटॅमिन डीला सनशाईन व्हिटॅमिन असे म्हणतात. कोवळ्या सूर्य प्रकाशात 30 मिनिटे राहिल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारे विटामिन आपल्याला मिळू शकते. आपल्या शरीराला पुरेसे विटामिन डी मिळण्यासाठी आपण आपल्या आहारात ह्या काही गोष्टींचा समावेश करू शकता.

आपल्या आहारात संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांचा समावेश केल्यास त्यामधून थोड्या प्रमाणात विटामिन डी आपल्याला मिळू शकते. दुध, दही, चीज, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थामध्ये देखील विटामिन डी घटक असतात.

त्यासोबतच अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये देखील विटामीन डी असते. ह्या गोष्टींचा आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश आपण करून विटामिन डी ची कमतरता दूर करू शकता. शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर झाल्याने आपल्याला चांगली झोप येऊ शकते.

आपल्याला कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे आपल्याला रात्री झोप येत नाही हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page