आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन ई खुप महत्वाचे असते. त्वचा, निरोगी केस आणि निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन ई अत्यंत आवश्यक असते,त्याचबरोबर व्हिटॅमिन ई शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. आज आपण समजुन घेउयात व्हिटॅमिन ई ची कमतरता दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय.
बदाम हे व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्रोत असतात. जर आपण 100 ग्रॅम बदाम खाल्ले तर आपल्याला 25.63 मिलीग्राम व्हिटॅमिन ई मिळू शकते. बदामाचे दूधही पिऊ शकता, असे केल्याने व्हिटॅमिन ई ची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल.
आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पालक मध्ये चांगल्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पालकमध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते. 100 ग्रॅम पालकमध्ये 2 ग्रॅम व्हिटॅमिन ई आढळते, जे आपल्या दैनंदिन गरजेपैकी 16 टक्के पूर्ण करते.
अक्रोड व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्रोत असतात. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये एन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. एन्टीऑक्सिडंट आरोग्यासह त्वचेचे पोषण करतात.
एन्टीऑक्सिडंट त्वचेतील घाण काढून टाकते आणि चमकणारी त्वचा बनवण्यास मदत करतात. आठवड्यातून एकदा पपई खाल्ली तरीसुद्धा व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर तो कायमचा दूर होईल.
शेंगदाणे व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्रोत आहे. आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करून आपण शरीरातील विटामिन ई ची कमतरता दूर करू शकता. या बरोबरच आपण मांसाहार करत असल्यास अंडी खाल्याने सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन ई मिळू शकते.
आपल्याला व्हिटॅमिन ई ची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.