विटामिन डी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील हाडे, दात स्नायू मजबूत ठेवण्यासाठी विटामिन डी अत्यंत आवश्यक असते. शरीरातील प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी विटामिन डी गरजेचे असते. आपल्या शरीराला दररोज 600 UI विटामिन डी ची आवश्यकता असते.

विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला थोडे काम केले तरी थकवा येतो, सतत अंगदुखी, पाठदुखी, सांधेदुखी होते, चिडचिडेपणा वाढतो,  चेहरा कायम सुस्तावलेला आणि नैराश्यपूर्ण दिसतो, जास्त प्रमाणात केस गळू लागतात.

आज आपण विटामिन डीची कमतरता दूर करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे जाणून घेणार आहोत. विटामिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात बसा.

आपल्या आहारात गायीचे दुध, दही, पनीर, मशरूम,संत्रे, सोयाबीन, गाजर, बदाम, अंडी अशा गोष्टींचा समावेश केल्याने आपण शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर करू शकता.

हाडांच्या मजबुतीसाठी आहाराबरोबरच शारीरिक व्यायाम गरजेचा असतो त्यामुळे विटामिन डी ची कमतरता असलेल्यांनी सायकल चालवणे, सूर्यनमस्कार करणे, योगा करणे, पोहणे, धावणे अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे.

वरती दिलेले घरगुती उपाय केल्याने आपल्या शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर व्हायला मदत मिळेल. हाडे निरोगी आणि मजबूत होतील. रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

स्नायू मजबूत होतील. चांगली झोप लागेल. आपल्याला विटामिन डी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page