व्हिटॅमिन सी च्या कमतरतेची लक्षणे, व्हिटॅमिन सी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

व्हिटॅमिन सी रक्तातील लाल कण तयार करण्यात खूप महत्त्वाचे कार्य करत असते. व्हिटॅमिन ‘सी’ म्हणजेच एस्कॉर्बिक ऍसिड हे शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे अँटी-ऑक्सिडंट असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन सी लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते.

महिलांना दिवसाला 75 मिलीग्राम तर पुरुषांना 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सीची गरज असते. आज आपण व्हिटॅमिन सी च्या कमतरतेची लक्षणे आणि व्हिटॅमिन सी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर होऊ शकते. आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो, थोडे काम केले तरी लगेच थकवा येऊ शकतो, धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, सर्दी, खोकला, ताप, मळमळ असे आजार होऊ शकतात, केस कोरडे होऊ शकतात, केस जास्त प्रमाणात गळायला लागू शकतात.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होते आणि चेहरा आणि शरीरावर सुरकुत्या पडतात, लहान मुलांमध्ये हाडांची वाढ थांबू शकते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे जखमा भरण्यास विलंब होतो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी हा आजार होऊ शकतो, अचानक वजन वाढायला लागू शकते, व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची समस्या उद्भवू शकते.

आता आपण व्हिटॅमिन सी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात. आपले शरीर व्हिटॅमिन सी स्वतः बनवू शकत नाही किंवा ते साठवू शकत नाही. त्यामुळे त्याची कमतरता भरून काढण्यासाठी रोज आहारात व्हिटॅमिन सी घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता.

संत्रा,मोसंबी,लीची, अननस, लिंबू यापैकी आपल्याला जे जमेल त्या गोष्टीचा आहारात समावेश करून आपण व्हिटॅमिन सीच्या कमतरता दूर करू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आपण आपल्या रोजच्या आहारात ताज्या आवळ्याचा समावेश केल्यास आपण  व्हिटॅमिन सीच्या कमतरता दूर करू शकता.

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला आलेला अशक्तपणा दूर करण्यासाठीही आपण आहारात ड्रायफ्रुटस चा समावेश करू शकता. ड्रायफ्रुट मध्ये व्हिटॅमिन सी तसेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात.

बदाम, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे, काजू, मनुके, अक्रोड इत्यादी ड्रायफ्रुटचा समावेश आपण करू शकता. ड्रायफ्रुटस रात्री भिजत ठेवावे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खा. असे केल्याने आपल्याला खूप फायदा होईल. व्हिटॅमिन सीच्या कमतरता दूर करण्यासाठी आपण पेरूचा आहारात समावेश करू शकता.

व्हिटॅमिन सीच्या कमतरता दूर करण्यासाठी आपण शेवग्याच्या पानांचा रस देखील पिवू शकता. शेवग्याच्या पानाचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन सी कमतरता दूर होऊ शकते.

आपल्याला व्हिटॅमिन सी कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page