नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूयांच्या लढाईची साक्ष देणारा ”विशाळगड”

विशाळगड हा शब्द कानावर येताच बाजीप्रभुंचे ते शब्द कानावर पडतात, ”लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.” या स्मृती थेट त्या प्रसंगाची आठवण करून देतात आणि नकळत अंगावर शहरे येतात. हीच ती पावन झालेली लढाई आणि हाच तो गड ज्याने महाराजांना सुखरूप आपल्या ओंजळीत सामावून घेतले.

या किल्ल्यावर जाताच पावनखिंडीची लढाई डोळ्यासमोर येते. ”राजं तुम्ही गडावर सुखरूप पोहचा आणि तोफेचे बार द्या, तोपर्यंत आम्ही गनिमास फत्ते करतो” असे म्हणणारे नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधीस्थाने येथे आहेत.

या किल्यावर भगवंतेश्वर मंदिर, राजवाडा, टकमक टोक, अमृतेश्वर मंदिर, बाजीप्रभुंची समाधी, पाण्याचे कुंड, फुलाजीप्रभू यांची समाधी, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, पाण्याची दोन तळी आहेत, यात एका तळ्याचे नाव भूपाल तळे तर दुसऱ्याचे नाव गौराई तलाव असे आहे.

गडावर रामचंद्रपंत अमात्य यांनी अर्धचंद्रकोर आकाराची विहीर आहे, तसेच  दारू कोठारांचे अवशेष, वेताळ टेकडी, राम मंदिर अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात.

गडावर राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी अहिल्याबाई यांचे वृंदावन आहे. पतीच्या निधनानंतर त्या येथे सती गेल्या होत्या. १७४० झाली करवीरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी या वृंदावनाचा जीर्णोद्धार केला.

हा गड कोल्हापूर जिल्यात येत असून किल्ल्याची उंची ११३० मीटर उंच आहे. किल्ला तटबंदी आणि बुरुजांनी वेढलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात येतो, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या या गडाची चढाई सोपी आहे.

या गडाला ‘खेळणा’ असेही म्हटले जाते. या किल्ल्यावर सद्या लोखंडी पूल बांधल्याने चढाईस आणखीन सोपा झाला आहे. हा किल्ला महाराजांच्या पदस्पर्शाने आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झाला आहे. हा किल्ला आजही मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देत उभा आहे.

हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्यात येतो. कोल्हापूर-शाहूवाडी-पावनखिंड-गजापूरमार्गे विशाळगड हे अंतर ८० किलोमीटर आहे. किल्ला चढाईसाठी सोपा असल्याने आपण गडावर लवकर पोहचतो. हा किल्ला एक दिवसात पाहून होतो, तसेच या गडावर सहकुटुंब येऊ शकता.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page