व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे येतात? व्हेरिकोज व्हेन्स येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे?

आज आपण व्हेरिकोज व्हेन्स विषयी अधिक माहिती घेणार घेणार आहोत. आजकाल जग इतक्या झपाट्याने बदलत चाललय आणि ह्या बदलणाऱ्या जगात आपली जीवनशैली बदलने हि काळाची गरज झाली आहे.

ह्या बदललेल्या जीवनशैलीमुळे एकाच जागेवर बराच वेळ बसून काम कराव लागत, घरच्या जेवणाऐवजी बाहेर हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामध्ये जेवण कराव लागत, कामाच्या व्यापामुळे नीट झोप घ्यायला हि जमत नाही; या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग आपल्या आरोग्यावर होतो, आणि मग आपल्याला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना सामोर जाव लागत.

आज आपण अश्याच एका आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या आजाराचे नाव व्हेरिकोज व्हेन्स; आपल्यापैकी बऱ्याच जणांना हि समस्या असू शकते म्हणून हि माहिती वाचल्यावर ज्यांना हा त्रास होत आहे त्यांना हि माहिती शेअर करा. त्यांना कमेंटमध्ये टॅग करा.

आपल्या पायांच्या रक्तवाहिन्या सुजून मोठ्या होतात या समस्येला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात. वयाच्या चाळीशीनंतर शरीरातील रक्तवाहिन्याची लवचिकता कमी होऊ लागते. त्या कमजोर व्हायला लागतात.

जेव्हा रक्तवाहिन्या कमजोर होतात तेव्हा खराब रक्त रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत. ज्यामुळे पायाच्या शिरा सूजतात आणि फुगून मोठ्या होतात. रक्त साचून राहिल्यामुळे मग त्याजागी आपल्याला गाठी सारख जाणवायला लागत.

आता आपण व्हेरिकोज व्हेन्स येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊयात. व्हेरिकोज व्हेन्स येऊ नये म्हणून आपण नियमित व्यायाम केला पाहिजे; नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होऊ शकते. आणि आपला व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो.

सायकल चालवणे, धावणे, सकाळी आणि संध्याकाळी चालायला जाणे, नियमित योगासने करणे, पोहायला जाणे अशा चांगल्या सवयी आपण स्वताला लावल्या तर आपल्याला हा आजार कधी होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीच केल्या पाहिजे अस काही नाही आपल्याला जे जमेल ती कोणतीही गोष्ट आपण करू शकता.

शक्य तितके शरीराला आराम द्या, आहारामध्ये पुरेसे फायबर घटक असलेल्या गोष्टींचा समावेश असू द्या, पुरेसे पाणी प्या या गोष्टी आपण स्वता करायला सुरुवात करा. हळूहळू आपल्याला असणारे आजार आपोआपच पळून जातील.

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही वेगवगळ्या आरोग्य समस्या विषयी माहिती देत असतो. आपण आमचे फेसबुक पेज लाईक/फॉलो केले तर हि माहिती अगदी मोफत आपल्याला वाचायला मिळू शकते. आपल्या ओळखीच्या ज्यांना पण हा त्रास होत असेल त्यांना ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करा.

आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे येतात? व्हेरिकोज व्हेन्स येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page