व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी उपाय

वयाच्या चाळीशीनंतर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याची लवचिकता कमी होऊ लागते. जर आपण रोजच तेलकट पदार्थ खात असाल, मांसाहार करत असाल, आणि आपले काम हे एकाच जागी बसून असेल तर आपल्या हाताच्या आणि पायाच्या नसामध्ये अडथळा निर्माण होऊन हातावर आणि पायावर अशुद्ध रक्ताच्या नसा दिसू लागतात यालाच व्हेरीकोज व्हेन्स असे म्हणतात.

आज आपण व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत. जर आपल्या शरीरावर व्हेरीकोज व्हेन्स आल्या असतील तर सगळ्यात पहिले आहारातील मिठाचा वापर कमी करा. याचबरोबर अती साखरेचे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.

एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका. तासभराने थोडं फिरण्याची आणि पाय मोकळे करण्याची सवय स्वताला लावा. व्हेरीकोज व्हेन्स कमी होण्यासाठी एरंडेल तेलाने अथवा तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा.

मालिश केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारून व्हेरीकोज व्हेन्स कमी होतात. व्हेरीकोज व्हेन्स कमी होण्यासाठी नियमितपणे दिवसातील काही वेळ शारीरिक व्यायामासाठी द्या. रोज शक्य तितके चाला; याचबरोबर पोहणे, योगा करणे अशा गोष्टी देखील आपण करू शकता.

व्हेरीकोज व्हेन्स कमी होण्यासाठी आपण सकाळी लसणाच्या 1 – 2 पाकळ्या खाऊ शकता. लसणाचे सेवन केल्याने शरीरातील रक्तवाहिन्यामधील अडथळा दूर व्हायला मदत मिळते. सकाळी कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो.

अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज लाईक/फॉलो करा. आपल्याला व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page