सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावाजवळ असलेला वसंतगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या पर्वात सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या गावाजवळील हा वसंतगड. हा किल्ला नैसर्गिक तटबंदीने वेढलेला असून पावसाळ्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेला हा किल्ला अतिशय शोभून दिसतो. पुणे-सातारा महामार्गावरून कऱ्हाडच्या अलीकडे 13 किलोमीटर अंतरावर तळबीड लागते.

तळबीडमध्ये गेल्यानंतर हंबीरराव मोहिते यांचे स्मारक उभारलेले दिसते. गाव संपताच वसंतगडाची सुरुवात होते. हा डोंगर चढून वर गेल्यानंतर ढासळलेली तटबंदी दिसते. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर गणरायाची भव्य रेखीव मूर्ती दिसते.

वसंतगडाच्या बरोबर मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे पुरातन मंदिर दिसते. या देवतेचे दर्शन घेण्यासाठी गडावर भाविकांची गर्दी होते. प्रदक्षिणा मार्गावर एका भिंतीवर ताम्रपटात काही नोंदी कोरल्या आहेत. त्यावर या देवाचा उल्लेख दिसतो.

वसंतगडावर पाण्याचे तीन मोठे तळे आहेत. या तळ्यांची नावे कोयनातळे, कृष्णतळे अशी आहेत. गडाच्या पश्चिम भागात भव्य प्रवेशद्वार आहे. हे गोमुखी प्रवेशद्वारे अर्धवर्तुळाकार भिंतींमध्ये उभे असून शत्रूला चकवा देण्यासाठी हे बांधले गेले असावे. या दरवाजाला “नाईकबा दरवाजा” असेही म्हटले जाते.

हा गड 930 मीटर उंच असून गिरीदुर्ग या प्रकारात येतो. गडाची चढाई सोपी असल्यामुळे हा गड एका दिवसात बघून होतो. हा किल्ला 1659 मध्ये शिवरायांनी स्वराज्य सामील करून घेतला. जंजिऱ्याहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस या गडावर होते.

त्यामुळे या गडाला ऐतिहासिक काळात अत्यंत महत्त्व होते. भोज शिलाहार राजाने बांधलेल्या गडात या किल्ल्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे हा किल्ला अतिशय प्राचीन आहे, परंतु किल्ल्याचे अवशेष पूर्णतः ढासळून गेलेले आहेत.

या गडावून कोयना नदीपात्र, सदाशिवगड, प्रीतिसंगम असा रमणीय परिसर दिसतो. हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यात वसल्याने पावसाळ्यात दुर्गप्रेमींनी गर्दी दिसते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page