व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी प्रभावशाली घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये रक्तवहन करणाऱ्या शिरामध्ये अडथळा निर्माण झाल्यावर त्या रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यामुळे त्या शिरा ठळकपणे दिसू लागतात यालाच व्हेरीकोज व्हेन्स असे म्हणतात. वयाच्या पस्तीशीनंतर शरीरातील रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कमी व्हायला लागते.

इतर अवयवांच्या तुलनेत आपल्या हात आणि पायाने आपण जास्त प्रमाणात हालचाल करत असतो त्यामुळे आपल्या हात आणि पायामध्ये शरीरामधील रक्तप्रवाह हा जास्त प्रमाणात असतो. व्हेरीकोज व्हेन्स हा आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो.

व्हेरीकोज व्हेन्स अर्थात अशुद्ध रक्तवाहिन्यांचा तसे पहिले तर काही विशेष त्रास नसतो. परंतु हळूहळू कालांतराने आपल्या शरीरात व्हेरीकोज व्हेन्स जास्त प्रमाणात झाल्यास मात्र आरोग्याशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

जसे कि स्ट्रोक येणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे अशा गोष्टी होण्याची शक्यता असते म्हणून व्हेरीकोज व्हेन्सवर वेळीच ईलाज करणे चांगल राहील.

आपल्या पायांवर असणाऱ्या व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास डाळिंब ज्यूस प्या. डाळिंबाचा रस नियमित प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण क्रिया व्यवस्थित व्हायला मदत मिळते.

शरीरातील रक्तवाहिन्यामधील अडथळा दूर होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मध मिसळून प्यायल्याने रक्तवाहिन्यामधील अडथळा दूर होऊन व्हेरीकोज व्हेन्स कमी होतील.

दररोज ग्रीन टी प्यायल्याने आपले वजन कमी होते. या शिवाय ग्रीन टी रक्त पातळ करण्याचे देखील काम करते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी देखील आपण नियमित ग्रीन टी चे सेवन करू शकता.

रक्तवाहिन्यामधील अडथळा दूर होण्यासाठी आपण पायांची मालिश देखील करू शकता. नियमितपणे ऑलिव्ह ऑईलने मालिश केल्याने काही दिवसात बंद नसा मोकळ्या होतील.

या बरोबरच रक्तवाहिन्यामध्ये आलेली सूज कमी होईल आणि व्हेरीकोज व्हेन्स मुळे पायाला होणाऱ्या वेदना देखील कमी होतील. वयाच्या पस्तीशी नंतर व्हेरीकोज व्हेन्स होऊ नयेत यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी आवर्जून करा.

आपल्या रोजच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी गोष्टींचा समावेश असुद्या, दररोज दिवसभरातील काही वेळ शारीरिक व्यायामासाठी देत चला. आपल्याला शक्य असल्यास चालणे, पोहणे, योगा करणे अशा शारीरिक परीश्रमाच्या गोष्टी आपण करू शकता.

नियमित योगासने केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत मिळते. आपल्या रोजच्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी असुद्या. शक्य असल्यास एका जागी जास्त वेळ बसून काम करू नका. आपल्या कामाच्या दरम्यान काही मिनिटांचा ब्रेक घेऊन तिथल्या तिथे चाला. एका जागी बसून राहिल्याने पायाच्या शिरांवर ताण येतो.

आम्हाला आशा आहे कि व्हेरीकोज व्हेन्स घालवण्यासाठी प्रभावशाली घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगाल; ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. पोस्ट नोटीफिकेशन सुरु करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page