वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा ह्या 05 टिप्स

वजन वाढल्याने हृदयविकार, कोलेस्ट्रोल, उच्च रक्तदाब, डायबेटीस असे आजार होण्याचा धोका असतो म्हणूनच आपण आपले वजन नियंत्रणात ठेवणे गरजेच आहे; शरीरात अतिरिक्त चरबी वाढू नये यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये हे काही साधे आणि सोपे बदल करायची सवय स्वताला लावू शकता आणि आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

आज जाणून घेऊयात अशाच काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. सकाळची सुरुवात एक किंवा दोन ग्लास पाण्याने करणे हा वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे.

पाणी तुमची ऊर्जा वाढवून तुमच्या शरीरात बर्न होणाऱ्या कॅलरीजची संख्या वाढवण्यास मदत करू शकते. एका अभ्यासानुसार, सकाळी 500 मिली पाणी प्यायल्याने चयापचय दर सरासरी 30% वाढू शकतो असे समोर आले आहे.

शक्य तितके तेलकट पदार्थ, अतिगोड पदार्थ खाणे टाळा. खास करुन बाजारात मिळणारे चिप्स खाणे पूर्णतः बंद करा. साखरेचे सेवन हे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

बरेच लोक त्याचे अति प्रमाणात सेवन करतात. साखरेमुळे लठ्ठपणा तसेच टाईप २ मधुमेह आणि हृदयविकार यांसारखे आजार होतात. वजन कमी करण्यासाठी साखरेचे सेवन टाळा.

अन्न नेहमी नीट चावून खा, यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होण्यास मदत होईल. आणि पाचनक्रिया सुधारली की वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तणावामुळे शरीरात असे काही हार्मोन्स तयार होतात जे वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तणावमुक्त राहा आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा तसेच योगा देखील करू शकता.

रात्रीचे खुप खाणे टाळा. रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला आहार हा नेहमी कमी आणि पचण्यास हलका असावा. जेवणाची वेळ निश्चित करा आणि रात्री उशिरा जेवू नका. जर तुम्ही उशिरा जेवलात तर तुमचे अन्न पचत नाही आणि जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो.

वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. जर झोप येत नसेल तर हार्मोन्समध्ये दररोज चढ-उतार होतात. पुरेशी झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा कमी झोप घेतलेल्या लोकांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.

दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शक्य तितके पायी चालायचा प्रयत्न करा. कुठे ही बाहेर जात असताना बसमधून एक स्टॉप आधी उतरा आणि बाकीचा मार्ग पायी चाला. किमान 10 ते 15 मिनिटे जरी तुम्ही चाललात तर तुम्ही 60 कॅलरीज बर्न करू शकता. हेच घरी जातानाही केले तर तुम्ही 120 कॅलरीज बर्न करू शकता.

हे छोटे बदल तुम्हाला तुमचे वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे छोटे बदल आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करणे अतिशय सोपे आहे.

आपल्याला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 05 टिप्स हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page