वजन कमी केल्यावर मांड्यांवर, पोटावर स्ट्रेच मार्क्स आल्यास करा हे घरगुती उपाय

आपल्या शरीरावरील त्वचा जर क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेल्यास स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात, साधारणपणे आपल्या पोटावर, कंबरेला, छातीवर, दंडावर आणि मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स येत असतात. आपले अचानक वजन वाढले असल्यास अथवा आपले वजन अचानक कमी झाल्यास, महिलांना ग’रोदरपणामध्ये आणि बाळ जन्मल्यानंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येत असतात.

आज आपण स्ट्रेच मार्क्स आल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकता याविषयी जाणून घेणार आहोत. पोटावरील आणि मांड्यावरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी दररोज रात्री झोपायच्या आधी त्यावर कोरफड जेल लावा. कोरफड जेल लावल्याने त्वचेला पोषण मिळून स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण त्यावर नियमित बदाम तेल लावू शकता. बदाम तेलामध्ये असणाऱ्या व्हिटामिन ई ह्या पोषक घटकामुळे आपली त्वचा मऊ होते तसेच स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

मांड्यावरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी अंड्याच्या सफेद बलक स्ट्रेच मार्क्सवर ब्रशच्या सहाय्याने लावा. 30 मिनिटे राहूद्या पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने धूऊन टाका. अंड्याच्या सफेद बलकामध्ये प्रोटीन आणि अमीनो एसिड्स असतात.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण त्यावर नारळाचे तेल लावून मालिश करू शकता. नारळाच्या तेलाने मालिश केल्याने कोरडी पडलेल्या त्वचेला पोषण मिळून स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

आपल्याला स्ट्रेच मार्क्स आल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकता ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page