ushnata kami karnyasathi upay

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Mahtvache

तुम्हाला शरीर शंभर वर्षे टिकवायचं ना, त्यासाठी आपण शरीराची काळजी देखील घेतली पाहिजे. जसे जसे थंडीचे दिवस येतात तस माणसाच्या शरीरात उष्णतेच्या प्रमाणात वाढ दिसून येते.

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. शरीरातील वाढत्या उष्णतेमुळे पिंपल्स येणे हाता पायांना भेगा पडणे खाज येणे. थंडीच्या दिवसात उष्णतेवर नियंत्रण मिळवणे हा त्यामागील उपाय आहे.

करंजाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यास त्वचा रोगावर नियंत्रण मिळवता येते. रात्री झोपताना करंजीच्या तेलाने हातापायांना मसाज केल्यास उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी होते. पळसाच्या पानाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. सहजरीत्या पळसाची पाने उपलब्ध होतात.

रात्री झोपताना नाकात तुपाचे दोन ते तीन थेंब टाकल्यास उष्णता कमी करण्यास मदत होते. कोरफडीचा गर पाण्यात मिसळून घेतल्यास त्याचे सेवन केल्यास शरीराला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. पाण्यात लिंबाचा रस आणि पुदिना टाकून प्या.

दैनंदिन आहारात ताकाचा समावेश नक्की करा ताकामुळे शरीरातील उष्णता ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे कडू लिंबाचा रस जर तुम्ही सेवन केला तर त्यानेदेखील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही जण थंडीच्या दिवसात देखील फ्रिजचे पाणी पितात. एक गोष्ट नक्की लक्ष्यात ठेवा आणि ती म्हणजे फ्रिज मधील थंड पाणी टाळा त्याऐवजी माठातील पाणी प्यावे.

पेरू हे फळ उष्णता आणि बुद्धीसाठी खूप चांगले आहे. पेरूचा सरबत जर आपण पिला तर त्यामुळे देखील उष्णता कमी करण्यास मदत होते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ती आम्हाला जरूर सांगा. अशीच माहिती नियमित वाचण्यासाठी आमच्या पेज आणि संकेतस्थळाला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *