शरीरात झपाट्याने युरिक ऍसिड पातळी वाढवणारे पदार्थ

प्युरिन हे अन्नपदार्थांमध्ये आढळणारे एक प्रकारचे रसायन आहे ज्याचे विघटन झाल्यावर आपल्या शरीरात युरिक ऍसिड तयार होत असते. शरीरात तयार होणारे युरीक ऍसिड आपली किडनी फिल्टर करून शरीरातून काढून टाकते.

जेव्हा आपल्या आहारात प्युरिन घटक असणारे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त असतात तेव्हा शरीरात प्युरीनचे युरिक ऍसिडचे प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि हे जास्तीचे युरिक एसिड किडनी गाळून शरीराबाहेर काढू शकत नाही, तेव्हा हे युरीक ऍसिड सांध्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि खूप वेदना होतात.

एखाद्या जागेवर बसल्यावर उठताना, बसताना त्रास होतो, अंगावर सूज येते, सांधेदुखी (गाउटचा) त्रास होऊ शकतो, हातापायाची बोटे वाकडी होऊ शकतात, लघवी करताना जळजळ होऊ शकते, लघवी करताना वेदना होऊ शकतात, लघवीमधून रक्त येऊ शकते, कि’डनी निकामी होऊ शकते म्हणूनच या लेखात आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने झपाट्याने यूरिक ऍसिड वाढू शकते.

दररोज आणि अति प्रमाणात गोड पदार्थ खाल्याने, केक, मिठाई सारखे साखरयुक्त पदार्थ अति प्रमाणात खाल्याने त्यामध्ये  फ्रुक्टोज असल्याने आपल्या शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. अल्को’होलमध्ये मोठ्या प्रमाणात प्युरिन घटक असतात, ज्यामुळे रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण वेगाने वाढू शकते.

दररोज मांसाहार केल्याने विशेषता मासे आणि मटण खाल्याने आपल्या शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. या बरोबरच सोयाबीन, पनीर, तूर डाळ यामध्ये जास्त प्रमाणात प्युरिन घटक असतात. त्यांचे हि सेवन प्रमाणातच करावे.

आम्हाला आशा आहे कि शरीरात झपाट्याने युरिक ऍसिड पातळी वाढवणाऱ्या अन्न पदार्थां बद्दल असलेली हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून आम्हाला सांगा.

आम्ही लवकरच या लेखाचा दुसरा भाग अर्थात युरीक एसिड वाढल्यावर कोणकोणती लक्षणे दिसून येतात हि माहिती देणार आहोत. आपल्यापर्यंत ती माहिती पोहचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page