युरिक ऍसिड हे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ असतो जो किडनीद्वारे बाहेर टाकला जातो. जर काही कारणामुळे किडनीचा काही आजार झाला तर यूरिक ऍसिड पूर्णपणे बाहेर टाकले जात नाही आणि ते शरीरात वाढू लागते.
मग युरिक ऍसिड पातळी वाढल्याने गाउट किंवा संधिवात सारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा शरीराच्या सांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात यूरेट क्रिस्टल्स जमा होत तेव्हा वेदना व्हायला लागतात.
शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्याने मुतखडा हा आजार होऊ शकतो. हातापायाची बोट दुखणे अशा समस्या होऊ शकतात. म्हणूनच शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असल्यास आपण पथ्य पाळणे गरजेच असत.
युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असल्यास आपण आपल्या आहारातून हायप्युरीन पदार्थ जसे कि बेकरी प्रोडक्ट, दा’रू, बिय’र, मासे, चिकन, मटन, अंडी, खेकडे, वाटाना, राजमा, उडीद, तेलकट पदार्थ खाणे तत्काळ थांबवले पाहिजे.
युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या आहारात आपण हिरव्या पालेभाज्या, फळे, लसून, सुंठ, हळद अशा गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा. तसेच दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या.
असे केल्याने अतिरिक्त युरिक ऍसिड लघवीवाटे बाहेर जायला मदत होईल. आपल्याला युरिक ऍसिड वाढले असल्यास काय पथ्य पाळावे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.