शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्याचे 5 प्रभावी उपाय

आजकाल युरिक ऍसिड वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. वयाच्या तिशीनंतर आपण आपल्या शरीराची पुरेशी काळजी घेतली नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. युरिक ऍसिड वाढल्यास सांधे प्रचंड दुखू लागतात.

हाता पायाची बोट सुजल्यासारखी दिसू लागतात. युरीक ऍसिड वाढल्यास गाऊट हा आजार होण्याचा धोका असतो. शरीरातील युरिक ऍसिड वाढू नये यासाठी आपण काय केले पाहिजे हे आज आपण समजून घेणार आहोत.

सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात शरीरात युरिक ऍसिड कशामुळे वाढत? आपल्या आहारातून आपण प्युरीन हा घटक असणाऱ्या अनेक गोष्टी खात असतो. प्युरीनयुक्त पदार्थांच्या विघटनाने यूरिक एसिड तयार होत असत; आपण जेव्हा लघवी करतो त्यावेळी हे अतिरिक्त प्युरीन आपल्या शरीराबाहेर पाठवल जात.

मात्र आपण जास्त प्रमाणात प्युरीन घटक असणारा आहार करत असाल तर आपले शरीर सगळेच प्युरीन शरीराबाहेर पाठवण्यास असमर्थ असत आणि शरीरात अतिरिक्त प्रमाणात जमा झालेलं प्युरीन मग युरीक एसिडच्या रुपात शरीरात साठायला लागत.

आता आपण प्युरीन घटक वाढवणारे अन्नपदार्थ कोणकोणते आहेत हे जाणून घेऊयात. मांसाहारामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते म्हणून युरीक एसिड वाढलेल असल्यास मांसाहार न करणे आपल्यासाठी चांगले राहील या बरोबरच सीफूडमध्ये खेकडा, कोळंबी या गोष्टी, चॉकलेट, चिप्स, मसालेदार पदार्थ, बिस्किटे, आइस्क्रीम आणि पॅकेज्ड फूड जितके टाळाल तितके तुमच्यासाठी चांगले राहील.

यासोबतच राजमा, मटार, पालक, तूर मसूर यांची डाळ खाणे हि टाळा. साखरेचे आणि मिठाचे अति सेवन करू नका. शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आपण हे 5 प्रभावी उपाय करू शकता. नियमित व्यायाम करायाची सवय स्वताला लावा.

शरीरातील युरिक ऍसिड कमी करायचे असेल तर आहाराबरोबरच दिवसभरात शक्य तितके जास्त पाणी प्या. युरिक ऍसिड कमी करण्यासाठी नियमित चांगली आणि पुरेशी झोप घ्या.

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी, लिंबू पाणी, संत्री, मोसंबी ज्यूस अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या.

आपल्याला शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्याचे 5 प्रभावी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page