युरीक एसिड कमी करण्यासाठी घरगुती उपाय

युरिक ऍसिड आपल्या शरीरामधील रक्तात आढळणारे रसायन आहे. आपण खालेल्या प्युरिन घटक असलेल्या अन्नाच्या पचन प्रक्रियेदरम्यान युरिक ऍसिड तयार होत असते. आपल्या शरीरात असणाऱ्या किडनी हे युरीक एसिड बाहेर काढण्याचे काम करत असतात; मात्र जेव्हा आपण प्युरिन घटक असलेले अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खातो.

तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या किडनी हे जास्त प्रमाणात तयार झालेले युरीक एसिड काढायला असमर्थ ठरतात त्यामुळे आपल्या शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढायला लागत. हे युरीक एसिड आपल्या सांध्यामध्ये साचून त्याचे क्रिस्टल तयार व्हायला लागतात.

युरीक एसिड प्रमाणापेक्षा वाढल्यामुळे आपल्या हाता पायाची बोटे वाकडी व्हायला लागतात, शरीरामधील युरिक ऍसिड पातळी वाढल्यामुळे सांध्यांमध्ये प्रचंड वेदना व्हायला लागतात, हात पायांना सूज येते, सांध्यांमध्ये युरीक एसिडच्या गाठी, गाऊट तयार व्हायला लागतात.

युरीक एसिड प्रमाणापेक्षा वाढल्यामुळे कि’डनीचे आजार होऊ शकतात, कि’डनी खराब होऊ शकते. आता आपण शरीरामधील युरीक एसिड कमी होण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो याविषयी जाणून घेऊयात.

युरीक एसिड कमी करण्यासाठी नियमितपणे सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा एपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या. एपल सायडर व्हिनेगर टाकलेले पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील युरीक एसिड कमी होईल. शरीर आतून साफ होईल. वजन कमी व्हायला मदत मिळेल.

युरीक एसिड कमी करण्यासाठी दररोज कमीत कमी 8ते10 ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा. दररोज भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील वाढलेले युरिक असिड लघवीमधून लवकर बाहेर पडेल.

शरीरातील युरीक एसिड कमी होण्यासाठी आपण सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने लिंबूमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन-सी घटकामुळे आपल्या शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी होते.

युरीक एसिड पातळी कमी होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात भिजायला ठेवा. सकाळी दात घासल्यावर सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी गाळून प्या. हा उपाय 15 दिवस केल्याने आपल्या शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी व्हायला लागेल. अन्नपचन व्यवस्थित होईल, पोट साफ होईल, एसिडीटी, पोटात गॅस होणे, अशा समस्या देखील कमी होतील.

शरीरातील युरीक एसिड कमी होण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात प्युरीन घटक असणारे अन्न पदार्थ न खाणे हा यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. दररोज मांसाहार केल्याने आपल्या शरीरात जास्त प्रमाणात प्युरीन घटक जातात म्हणून शरीरात यूरिक ऍसिड वाढलेले असलेल्यानी युरीक एसिड कमी होण्यासाठी मांसाहार करणे, मासे खाणे थांबवणे गरजेच आहे.

आपल्या रोजच्या आहारातील साखरेचे पदार्थ, कोल्डड्रिंक्स, मिठाई, यामध्ये साखरेचे जास्त असते. या गोष्टी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ऍसिड झपाट्याने वाढते. त्यामुळे अश्या गोष्टींचे सेवन प्रमाणात करणेच आपल्यासाठी हितकारक आहे.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने त्यामध्ये असणाऱ्या एंटी-इनफ्लैमटरी गुणधर्मामुळे यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊ शकते. दररोजच्या आहारात जास्त प्रमाणात फायबर घटक असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश केल्याने यूरिक ऍसिडची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते.

फायबर घटक असलेले पदार्थ खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येऊ शकते. तंतुमय फळांमध्ये, पालेभाज्यामध्ये, गाजर, मुळा, बीट, रताळे यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आपल्याला युरीक एसिड कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page