अपर लिप्सवरील केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

बहुतेक स्त्रियांच्या वरच्या ओठांवर लव असते. बऱ्याचदा हि लव काढून टाकण्यासाठी आपण  ब्युटी पार्लरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेदनादायी ट्रीटमेंट करून घेत असतो. शरीरातील  हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ओठांवर लव येत असते. आज आपण  अपर लिप्सवरील केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

ओठांवरील केस काढून टाकण्यासाठी एका पॅनमध्ये साखर गरम करून घ्या. त्यानंतर एक लिंबू घ्या. लिंबू पिळून त्याचा रस काढून साखरेच्या मिश्रणात मिसळा. तो रस पेस्ट तयार होईपर्यंत ढवळत राहा. पेस्ट तयार झाल्यावर थंड होऊ द्या.

त्यानंतर आपल्या अपर लिप्सवर  लावा. 10 मिनिटे सुकून द्या. आणि नंतर पाण्याने धुऊन टाका.  लिंबाच्या रसामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे अपर लिप्सवरील  केसांचा रंग हलका होण्यास मदत होते.

अपर लिप्सवरील केस काढून टाकण्यासाठी एक चमचा मध घ्या त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण आपल्या अपर लिप्सवर लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्यात टॉवेल बुडवून त्याने पुसून काढा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन काढा.

अपर लिप्सवरील केस काढून टाकण्यासाठी एक चमचा हळद पावडर आणि थोडेसे बेसन हे पाण्यामध्ये मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट  अपर लिप्सवर लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर हाताने रगडून हे काढून टाका.

ओठांवरील केस काढून टाकण्यासाठी एक अंडे घ्या. ते फोडून त्यातील पांढरा बलक बाहेर काढा. त्यामध्ये मक्याचे पीठ आणि एक चमचा साखर मिसळून चांगली पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने आपल्या अपर लिप्सवरवर लावा. 15 / 20 मिनिटे सुकून द्या. नंतर सुती कपड्याने चेहरा साफ करून घ्या. अन चेहरा साध्या पाण्याने धुऊन घ्या.

आपल्याला अपर लिप्सवरील केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page