उन्हाळ्यात कैरी पन्हे प्यायल्याने मिळणारे 5 आश्चर्यकारक फायदे

कैरी पन्हे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण कैरी पन्हे सेवन करू शकता.

कैरी पन्ह्यामध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम  कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-बी 1, बी2 आणि व्हिटॅमिन-सी असे पोषक घटक असतात.

व्हिटॅमिन-सी ह्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होऊ शकतो. ह्या आजारामध्ये हिरड्या दुखतात त्यांच्यामधून रक्त येत, अशक्तपणा येतो. नियमित कैरी पन्ह्याचे सेवन केले तर आपण समस्येपासून मुक्त होऊ शकता.

गर्भवती स्त्रियांनी कैरी पन्ह्याचे सेवन केले तर कैरी पन्ह्यामध्ये असणाऱ्या फॉलेट ह्या पोषक घटकामुळे गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे व्हायला मदत मिळते.

कैरी पन्ह्यामध्ये असलेल्या एंटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी ह्या पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत मिळते. कैरी पन्ह्याचे सेवन केल्याने शरीरात नवीन रक्तपेशी निर्माण व्हायला चालना मिळते.

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी आपण कैरी पन्ह्याचे सेवन करू शकता. कैरी पन्ह्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे थकवा दूर व्हायला मदत मिळते. कैरी पन्ह्याचे सेवन केल्याने पोटाच्या सबंधित असणारे अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या या आजारांची तीव्रता कमी व्हायला मदत मिळते.

मुळव्याध हा आजार असल्यास जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेच असत जर आपल्याला सारख सारख पाणी पिवू वाटत नसेल तर आपण कैरी पन्ह्याचे सेवन करू शकता. आपल्याला उन्हाळ्यात कैरी पन्हे प्यायल्याने मिळणारे 5 आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page