उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर घाम येऊन पिंपल्स यायला लागतात, चेहरा कोरडा पडतो, टॅनिंग, सनबर्न यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात, तेलकट त्वचा आणखी तेलकट होते आणि कोरडी त्वचा आणखी कोरडी होते.
उन्हाळ्यात उन्हाचा आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होऊन आपला चेहरा निस्तेज आणि काळपट दिसू लागतो. म्हणूनच आज आपण उन्हाळ्यात चेहरा फ्रेश दिसण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
चेहरा फ्रेश दिसण्यासाठी रात्री झोपायच्या आधी चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा तजेलदार दिसेल. कोरफडमध्ये आढळणाऱ्या एंटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात. कोरफडीच्या वापराने चेहऱ्यासाठी आवश्यक पोषण मिळते.
गुलाबपाणी आपला चेहरा स्वच्छ करते आणि त्याचा कोमलता टिकवून ठेवते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा आणि नंतर मसाज करा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने आपला चेहरा तजेलदार दिसू लागेल.
चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी दही अत्यंत प्रभावी आहे. एका वाटीत थोडेसे दही घ्या त्यानंतर हलक्या हाताने ते आपल्या सम्पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे राहूद्या त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आपल्याला फरक दिसून येईल.
बाहेर उन्हात जाण्यापूर्वी एसपीएफ 20 ते 30 असलेले सनस्क्रीन वापरा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी १५ मिनिटे आधी त्वचेवर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका.
चेहरा फ्रेश दिसण्यासाठी दिवसातून किमान ६ ते ७ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहील आणि त्वचा टोन्ड होईल. याशिवाय काकडी, टोमॅटो, संत्री अशी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत.
यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खाणे गरजेच असत. आपल्याला उन्हाळ्यात चेहरा फ्रेश दिसण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.