ऑफिसमध्ये काम करत असताना कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा वेळेवर पाणी प्यायचा, वेळेवर लघवीला जायचा कंटाळा केला जातो. बहुतेक बैठे काम करणाऱ्यांमध्ये हि सवय आपल्याला पाहायला मिळते. वेळेवर पाणी न प्यायल्याने डीहायड्रेशन होण्याचा धोका असतो. तसेच वेळेवर लघवीला जायचा कंटाळा केल्याने किडनीचे आजार होण्याचा धोका असतो.
याचबरोबर उन्हाळी लागण्याची देखील शक्यता असते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ, आग होणे. म्हणूनच आज आपण उन्हाळी लागल्यावर नेमके कोणकोणते घरगुती उपाय केल्याने आराम मिळू शकतो हे जाणून घेणार आहोत.
सध्या उन्हाळा सुरु असल्याने आपल्या शरीराची पाण्याची गरज नेहमीपेक्षा जास्त असते. जर आपल्याला तहान लागली तर अशावेळी आपण पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. उष्णतेमुळे आपल्याला घाम येत असतो. घामामधून, लघवीमधून आपल्या शरीरातील पाणी बाहेर पडत असत. म्हणून तहान लागल्यावर आपण पाणी प्यायचा कंटाळा करू नका.
शक्य झाल्यास नारळाचे पाणी, उसाचा रस, संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद, कलिंगड, खरबूज, काकडी, टरबूज, द्राक्ष, डाळिंब अशा फळांचा ज्यूस देखील पिवू शकता. याचबरोबर कोकम सरबत, लिंबू सरबत, जलजीरा, कैरीचे पन्हे, सोलकढी, ताक असे द्रव पदार्थ देखील पिवू शकता. उन्हाळ्यात जमेल तितके द्रव पदार्थ आपण प्यायले पाहिजेत.
उन्हाळी लागल्यावर आपण हा सोपा उपाय करून बघू शकता; यासाठी पुदिन्याची काही पाने घ्या त्यांची बारीक पेस्ट करून एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून ते पाणी प्यायल्याने उन्हाळी लागल्यामुळे होणाऱ्या वेदना थांबण्यास मदत होते.
जर आपल्याला जास्त त्रास होत असेल तर हा उपाय दिवसातून तीन ते चार वेळा करा. धने पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने देखील उन्हाळीमुळे होणाऱ्या वेदना थांबायला मदत मिळते.
अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्रित करून ग्लासभर पाण्यात मिसळून दिवसातून दोनवेळा प्या. असे केल्याने लघवी करताना होणारा त्रास आणि वेदना कमी होईल.
उन्हाळी लागू नये यासाठी शरीराला शक्य तितके हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. बाहेर पडताना पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरा. अति तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आपल्याला उन्हाळी लागणे, लक्षणे आणि घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.