उंची वाढण्यासाठी घरगुती उपाय

उंची कमी आणि अधिक असणे हे बऱ्याचअंशी अनुवांशिक घटकांवर असते. मात्र योग्य वयात पोषक आहार घेतल्याने, दररोज व्यायाम केल्याने आपली उंची वाढू शकते. लहान मुलांची उंची वर्षाला 2 इंच इतकी वाढत असते.

तसेच पौंगडावस्थेनंतर वर्षाला 4 इंच इतकी उंची वाढत असते. वयाच्या 20-22 वर्षापर्यंत आपली उंची वाढण्याची क्रिया पूर्ण होते. आज आपण उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

वाढत्या वयात आपल्या शरीराला योग्य पोषक घटक असलेला आहार मिळणे गरजेच असत. आपल्या शरीराच्या विकासासाठी विटामिन, खनिजे, प्रोटीन अशा गोष्टींची गरज असते.

उंची वाढण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, ताजी फळे, सुकामेवा (काजू, बदाम, मनुके, अक्रोड, शेंगदाणे) दुध, दुधाचे पदार्थ, अंडी, मासे असे पदार्थ असले पाहिजेत.

रोजच्या रोज योगा आणि व्यायामाची सवय मुलांना लावली तर बालपणातच उंची झपाट्याने वाढू शकते. लहानपणापासून ताडासन हा योग प्रकार नियमित केल्याने उंची वाढायला मदत मिळते.

बऱ्याच जणांना पोक काढून ( पाठीला बाक देऊन ) चालायची सवय असते, पोक काढून चालल्याने कुबड येऊ शकते आणि आपल्या उंचीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. चालताना पाठीचा कणा सरळ असणे गरजेच आहे. जर आपल्याहि पाठीला कुबड आले असेल तर दररोज योगासन, सूर्यनमस्कार केल्याने पाठीचा कणा मजबूत होऊ शकतो.

उंची वाढण्यासाठी सायकलिंग, दोरउड्या, सूर्यनमस्कार, पोहणे, धावणे असे शारीरिक कसरतीचे व्यायाम आपण करू शकता. लटकण्याचा व्यायाम केल्याने हातांचे स्नायू मजबूत होतात, तसेच उंची वाढायला मदत मिळते.

आपल्या शरीराची उंची वाढण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच पुरेशी झोप घेणे देखील गरजेच आहे. मुलांना घरात बनवलेले जेवण खाण्याची सवय लावा. बाहेरचे मैदायुक्त अन्नपदार्थ, फास्टफूड, चिप्स, कोल्डड्रिंक्स या गोष्टी देऊ नका. त्यांच्याकडून दररोज शारीरिक व्यायाम करून घ्या.

रात्री झोपण्याआधी 1 ग्लास गायीचे दुध प्यायला द्या, गायीचे दुध पचायला हलके असते. त्यामध्ये कॅल्शियम घटक मोठ्या प्रमाणात असतात. गायीचे दुध नियमित प्यायल्याने हाडे, स्नायू मजबूत होतात. मुलांचा शारीरिक विकास चांगल्याप्रकारे होतो.

दररोज सकाळी कोवळ्या उन्हात 30 मिनिटे शारीरिक व्यायाम केल्याने मुलांच्या शरीर विकासासाठी आवश्यक विटामिन डी त्यांना मिळेल. आपल्याला उंची वाढण्यासाठी घरगुती उपाय यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page