उचकी, दमा, जुनाट कोरडा खोकला, मुतखडा यावर प्रभावशाली उपाय म्हाळुंग फळ

म्हाळुंग हे फळ लिंबू , संत्री, मोसंबी या वर्गातील अत्यंत रुचकर असे फळ आहे. म्हाळुंग फळाची साल बरीच जाड असते. म्हाळुंग फळाचा मध्यभाग आंबट असतो. गोड आणि आंबट अशा दोन जाती असून चवीनुसार गुणधर्मात बराच फरक पडतो. चला तर जाणून घेऊयात म्हाळुंग फळ खाण्याचे फायदे.

म्हाळुंग फळामध्ये व्हिटॅमिन-सी फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, तांबे, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, फिनॉल ऍसिड असे घटक असतात. तोंडाला चव नसल्यास म्हाळुंग सेवन करावे असे केल्याने तोंडाला चव येते.

जुनाट कोरडा खोकला येत असल्यास म्हाळुंगाचे सेवन केल्याने आराम मिळतो. म्हाळुंगाचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या विटामिन सीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते.

मुतखडयाचा त्रास असल्यास म्हाळुंगाचे सेवन केल्याने मुतखड्याचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. सकाळी रिकाम्यापोटी 1 कप म्हाळुंगाचा रस प्या. असे केल्याने आकाराने लहान असणारे खडे विरघळून लघवीद्वारे बाहेर पडतात.

शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी म्हाळुंग फळांचे सेवन करा. अजीर्णामुळे पोटात दुखून त्रास होत असेल तर म्हाळुंगाचे सेवन केल्याने आराम मिळतो.

आपल्याला म्हाळुंग फळ खाण्याचे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page