उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्याला कामाच्या व्यापामुळे अति चिडचिड करण्याची सवय असल्यास, अयोग्य आहाराचे सेवन दीर्घकाळ केल्याने, अति वजन वाढल्याने, घरच्या काही गोष्टींमुळे कायम ताण तणावात असाल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो.

अचानक प्रमाणापेक्षा रक्तदाब वाढला असल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, किडनी खराब होऊ शकते. सामान्य माणसाचा रक्तदाब हा 140/90 mm hg पेक्षा जास्त झाल्यास अशा परस्थितीला उच्च रक्तदाब अस म्हणता येईल.

आज आपण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. रक्तदाब नियंत्रणात राहण्याठी आपल्याला आहाराचं पथ्यपाणी सांभाळाव लागेल. आहारातून तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे थांबवावं लागेल.

मिठाचा वापर आहारात कमी प्रमाणातच केला पाहिजे मात्र काही लोकांना कोणत्याही पदार्थावर वरती मीठ टाकून खायची सवय असते तसे करणे तत्काळ थांबवले पाहिजे, मांसाहार केल्याने हि रक्तदाब वाढतो त्यामुळे मांसाहार करणे थांबवल्याने रक्तदाब नियंत्रणात राहील.

रक्तदाब नियंत्रणात राहण्याठी रोज सकाळी कोवळ्या उन्हात 30 मिनिटे चालायची सवय स्वताला लावा. चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते.

वजन वाढल्याने रक्तदाब वाढतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात योग्य तो बदल करून आपण वजन कमी केल पाहिजे. दररोज योगा केल्याने वजन नियंत्रणात राहायला मदत मिळू शकते.

अन्न पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणं टाळा. आपल्या आहारात मिठाचे सेवन अधिक असल्यास त्यामध्ये असणाऱ्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो त्यामुळे मिठाचे सेवन प्रमाणातच करा. मानसीक ताणतणाव कमी होण्यासाठी आवडत्या छंदामध्ये आपले मन रमवा, आवडीचे संगीत, गाणी ऐका, दररोज ध्यानधारणा करा.

रक्तदाब नियंत्रणात राहण्याठी दररोज पुरेसे पाणी प्या. सामान्य माणसाने दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. भरपूर पाणी प्यायल्याने रक्तातील अशुद्धी दूर व्हायला मदत मिळते. पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीला साफ येऊन किडनी देखील साफ राहायला मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहण्याठी दररोज सकाळी 2-3 लसणाच्या पाकळ्या चावून खा. लसणाचे सेवन केल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहण्याठी आपण आल्याचा तुकडा चघळू शकता. आल्यामध्ये असणाऱ्या एन्टीऑक्सीडेन्ट घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते.

आपल्याला उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page