त्वचा कोरडी पडल्यास हे घरगुती उपाय करा

हिवाळ्यामधील सर्वांची सामान्य समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे. त्वचा सुंदर आणि निरोगी असणे प्रत्येकालाच आवडते. परंतु हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेमधील ओलावा निघून जाऊन आपली त्वचा कोरडी, निस्तेज, सुरकुतलेली दिसते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे दूषित हवा, प्रदूषण यापासून आपल्या त्वचेचा बचाव करा. आज आपण त्वचा कोरडी पडल्यास कोणते उपाय करता येतील हे पाहणार आहोत.

नियमितपणे गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे चेहऱ्यावरील ताजेतवानेपणा निघून जाऊन चेहरा काळपट दिसतो. त्यामुळे आंघोळ करताना अथवा चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर न करता अगदी कोमट अथवा थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.

रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर त्वचेवर लावून काही काळ ठेवा. कोरफड हा त्वचेच्या सर्व समस्येवर एक रामबाण उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही रोज करत असाल तर तुमची त्वचा कोरडी पडणार नाही. तुमच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील.

त्वचा कोरडी पडत असल्यास त्वचेवर रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्यास तेलातील स्निग्ध गुणामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते आणि तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे त्वचा मऊ होऊन त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होईल. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील.

थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मॉइच्युरायझर क्रीम अथवा तेल लावणे पसंत करा. हर्बल साबणाचा वापर करा. रासायनिक साबणाचा वापर केल्यामुळे त्वचा लवकर कोरडी पडते. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. पाणी भरपूर प्या. त्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये आद्रता टिकून राहून त्वचा कोरडी पडणार नाही.

आपल्याला त्वचा कोरडी पडल्यास कोणते उपाय करता येऊ शकतात. हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page