ग्लिसरीनचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी बनवलेल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. त्वचेवर ग्लिसरीन लावल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपली त्वचा कोरडी पडली असल्यास दररोज रात्री झोपायच्या आधी आपल्या चेहऱ्यावर ग्लिसरीन लावा. सकाळपर्यंत आपली त्वचा मऊ होईल आणि त्वचेवरील कोरडेपणा दूर होईल. यासोबतच चेहऱ्यावर चमक येईल.
आपल्या पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर ग्लिसरीन लावा. ग्लिसरीन लावल्याने टाच मऊ होईल टाचांना पडलेल्या भेगा जातील. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ग्लिसरीन फायदेशीर असते. ग्लिसरीनचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.
सूर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण त्वचेवर ग्लिसरीन लावू शकता. जेव्हा तुम्ही कडक उन्हात जाल तेव्हा त्यापूर्वी चेहऱ्यावर आणि हातांना ग्लिसरीन लावा. ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून लावल्याने उन्हापासून आपल्या त्वचेचे रक्षण होते. ग्लिसरीन लावल्याने त्वचेवर टॅनिंगचा त्रास होणार नाही.
उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग झालेले असल्यास दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर ग्लिसरीन लावा. सकाळी चेहरा धुवा. हळहळू टॅनिंग निघून जाईल. जर आपल्या डोळ्या खाली काळी वर्तुळे आली असतील तर रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने ग्लिसरीन डोळ्यांखाली लावा कोरडे होऊ द्या. रोज रात्री झोपताना ग्लिसरीन लावल्याने डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे कमी होतात.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी चंदन पावडरमध्ये ग्लिसरीन मिसळा. एक चमचा चंदन पावडर घ्या. त्यात थोडे ग्लिसरीन घाला. ते मिक्स करून फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर मानेवर लावा. 30 मिनिटे राहूद्या त्यानंतर चेहरा पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा. असे केल्याने चेहऱ्यावर चमक येईल.
आपल्याला त्वचेवर ग्लिसरीन लावल्याने मिळणारे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.