तुतीचे फळ जेवढे चवदार असते तेवढेच ते आरोग्यदायी देखील असते. आयुर्वेदात तुतीचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुतीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. चला तर जाणून घेऊयात तुतीचे सेवन केल्याने मिळणारे फायदे.
तुतीचे सेवन केल्याने किडनी साफ व्हायला मदत मिळते, लघवीच्या संबंधित अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो. तुतीचे सेवन केल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबायला मदत मिळते.
तुतीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण तुतीमध्ये हायपरग्लायसेमिक प्रभाव आढळतो, जो रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरतो.
तुतीचे सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, त्यामुळे अनिमियाची तक्रार दूर व्हायला मदत मिळते. तुतीमध्ये कॅल्शियम घटक आढळतात आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असते. तुतीमध्ये हायपरटेन्सिव्ह प्रभाव आढळतो, जो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतो.
शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुतीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण तुतीमध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात, तुतीचे सेवन केल्याने रक्तातील चरबी कमी होते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, तसेच हृदयही निरोगी राहते.
तुतीची पाने जखमांवर किंवा फोडांवर लावल्याने जखमा लवकर बऱ्या होतात. आपल्याला तुतीचे सेवन केल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.