आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तुरटीचा खडा अर्थात फिटकरी केशकर्तनालयात नक्की बघितला असेल. दाढी केल्यानंतर काचेसारखा असणारा हा खडा त्वचेवरून फिरवल्याने दाढी केलेल्या जागेवरची खाज, वेदना कमी होतात.
जुन्या जाणत्या माणसांना तुरटीचे औषधी गुणधर्म माहित होते म्हणून जवळपास प्रत्येक घरी तुरटीचा खडा असायचाच. तुरटीचा आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.
लहान मुलांना बऱ्याचदा हाताला पायाला खरचटत त्यातून रक्त येत हे रक्त थांबवण्यासाठी तुरटीची थोडीशी पावडर त्यावर लावा. तुरटीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे रक्त थांबेल आणि वेदना देखील कमी होतील.
कोमट पाण्यात तुरटीचा खडा विरघळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाला येणारा दुर्गंध नाहीसा होतो; तसेच दात दुखत, दाढ दुखत असेल तर त्याच्या वेदना देखील कमी होतात.
खोकला येत असल्यास तुरटीचा लहानसा खडा अथवा थोडीशी तुरटी पावडर कोमट पाण्यात मिसळून त्या पाण्याने दिवसातून 3 वेळा गुळण्या केल्याने खोकला थांबतो.
कोमट पाण्यात तुरटीचा खडा विरघळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने अंगाला येणारी खाज थांबते, अंगाला येणारा घामाचा वास नाहीसा होतो. खरुज, नायटा असे त्वचारोग बरे होतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी नियमितपणे तुरटीचा खडा पाण्याने ओला करून चेहऱ्यावरून फिरवा.
दररोज वेगवेगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक / फॉलो करा. आपल्याला तुरटीचे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी महत्वाचे फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.