तुंबाड या चित्रपटात दाखवलेला पुरंदरे वाडा पाहताक्षणी भयावह वाटतो. परंतु हाच वाडा एकेकाळी वैभवतेने संपन्न होता. हा वाडा वास्तुरचनेचा उत्तम नमुना होता.
पुणे जिल्ह्यातील सासवड येथील कऱ्हा नदीकाठी वसलेला हा वाडा पेशवे सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी इ. स. १७१० मध्ये बांधला. हा वाडा जणू काही शनिवार वाड्याचा जुळा भाऊच वाटतो.
चक्क या वाड्याला २५ फूट उंच दरवाजा आहे. वाड्याची अवाढव्य तटबंदी पाहून त्याकाळच्या वास्तुकलेची उच्चता लक्षात येते. मुख दरवाज्यावर कोरलेली सुंदर गणेशपट्टी असून सुंदर नक्षीकामाने हा दरवाजा सजवला आहे. या वाड्यात दिवाणखाना, देवड्या, लाकडी नक्षीकाम, बलाढ्य बुरुज, पाण्याची टाके असे अनेक अवशेष आहेत.
शिवकालीन आणि पेशवेकालीन या दोन्ही काळाचा इतिहास जपणाऱ्या वाड्यात पुरंदरे यांचे वंशज अंबारीतून वाड्यात प्रवेश करत असत. इतका वैभव संपन्न हा वाडा होता.
सातारचे शाहू महाराज यांना गादीवर बसविण्यात सरदार पुरंदरे यांनी पुढाकार घेतला. या वाड्याशी अनेक ऐतिहासिक संबंध जोडले गेले आहेत. त्यामुळे हा वाडा महत्वपूर्ण ठरतो.
वाडा बांधण्यासाठी खडकाळ जमिनीची पाहणी करून चार एकर क्षेत्रावर या भव्य वाड्याचे बांधकाम करण्यात आले. सुमारे तीनशे वर्षांपुर्वीच्या रंगीत भित्तिचित्रे आजही आहेत तशा दिसतात. या वाड्यातून भुयारे खोदलेली आहेत. सद्या ही भुयारे बुजली असून याचा मार्ग कुठपर्यंत जातो हे सांगणे कठीण आहे.
इतिहासाची साक्ष देणारा हा अतिविशाल पुरंदरे वाडा आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. एकेकाळी वैभवतेने नटलेला हा वाडा आज पाहण्याच्या स्थितीत ही नाही. या वाड्यातील अनेक वस्तूंची पडझड झाली असून बऱ्याच वस्तू लुटून नेल्याचे चित्र दिसते. असे न होता इतिहासाचा हा साक्षीदार जिवंत ठेवला पाहिजे.
आपल्याला तुंबाड चित्रपटातील पुरंदरे वाड्याविषयी ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.