तुळशीच्या बिया दुधात मिसळून प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

आपल्याला तुळशीचे झाड प्रत्येक घरात पाहायला मिळते. तुळशीला पवित्र मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. तुळशीच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचा वापर अनेक औषधामध्ये केला जातो तेसेच तुळशीच्या बियामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात.

तुळशीच्या बिया गॅस, एसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम देतात. आज आपण तुळशीच्या बिया दुधात मिसळून प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

तुळशीच्या बिया दुधात मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. तुळशीच्या बिया दुधात मिसळून प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

दररोज रात्री कोमट दुधामध्ये एक चमचा तुळशीच्या बिया मिसळून प्यायल्याने शीघ्रपतनाच्या समस्येपासून आराम मिळतो. तुळशीच्या बिया, अश्वगंधा, मुसळी आणि दूध एकत्र घेतल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते. तुळशीच्या बिया कोमट दुधासोबत घेतल्याने पुरुषांमधील नपुंसकता दूर होते.

महिलांना मा’सिक पाळीच्या दिवसात वेदना होत असल्यास त्यांनी 5 ग्रॅम तुळशीच्या बिया पाण्यात किंवा दुधासोबत मिसळून प्यायल्याने मा’सिक पाळी दरम्यान होणारा त्रास दूर होतो.

आपल्याला तुळशीच्या बिया दुधात मिसळून प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page