तुळशीच्या पानांचे आणि बियांचे 12 महत्वाचे फायदे आणि औषधी गुणधर्म

भारतातील बहुतेक घरांच्या अंगणात तुळशीचे झाड असते. घराजवळ तुळशीचे झाड असल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. आज आपण तुळशीच्या पानांचे आणि बियांचे 12 महत्वाचे फायदे आणि औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

तुळशीच्या पानांचा रस सकाळ आणि संध्याकाळ घेतल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. तोंडाला दुर्गंध येत असल्यास तुळशीची पाने चघळल्याने दुर्गंध नाहीसा होतो. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

तुळशीची पाने चघळल्याने तणाव कमी व्हायला मदत मिळते. तुळशीच्या पानांचा रस कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असतो; कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन असत.

जुलाब होत असल्यास तुळशीच्या पानांचा रस आणि जीरा पावडर एकत्रित करून दिवसातून ३-४ वेळा घेतल्याने जुलाब थांबतात. तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो.

रोज एक चमचा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मुतखडयाचा त्रास कमी होतो. तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते; चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात.

पुरुषांची शारीरिक कमजोरी, नपुंसकता आणि लैंगिक दुर्बलता दूर करण्यासाठीही तुळशीच्या बियांचा वापर केला जातो. मासिक पाळीची अनियमितता दूर करण्यासाठी 3 दिवस एक चमचा तुळशीच्या बिया चावून दिवसातून दोन वेळा चावून खा.

तुळशीच्या पानांचा रस अंगावर लावल्याने डास व इतर कीटक चावत नाहीत. रोज एक चमचा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील यूरिक ऍसिड कमी व्हायला मदत मिळते.

रोज सकाळी पाण्यात तुळस टाकून आंघोळ केल्याने त्वचा निरोगी राहते. आपल्याला तुळशीच्या पानांचे आणि बियांचे फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page