तुळजापूर तुळजाभवानी मंदिराचा इतिहास

आपल्या देशात एकून ५१ शक्तिपीठं विविध ठिकाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जे साडेतीन शक्तिपीठं आहे त्यामधील एक प्रसिद्ध श्रद्धास्थान म्हणजेच तुळजापूरचे भवानीमाता मंदिर हे आहे. श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्य पीठ मानल जात.

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘बालाघाट’ डोंगरमाथ्यावर हे ठिकाण वसलेलं आहे. या मंदिराच्या आत मध्ये प्रवेश करण्यासाठी अंदाजे ९० दगडी पायऱ्या आहेट ज्या दोन टप्प्यांमध्ये उतराव्या लागतात.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती.

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे.

या प्राचीन मंदिरात आढळणाऱ्या दोन दगडी दीपमाळा प्रवेशद्वारा जवळ आहेत. प्रमुख उत्सव प्रसंगी रात्रीच्या समयी या दीपमाळा प्रज्ज्वलित करून दीपोत्सव साजरा केला जातो.

तुळजाभवानी देवीचे मंदिर बालाघाटामधील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर सुद्धा या मंदिराचा कळस दिसत नाही. दर्शनासाठी येणाऱ्या भक्त-भाविकांना सुरक्षितपणे मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिरच्या भिंतीला लागून लोखंडी कठडे उभे केले आहेत. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला आहे आणि त्याच्यावर सुरेख असे नक्षीकाम केलेले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते.

तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

मंदिराच्या आवारात मोठे होमकुंडही आहेत. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथे असणारी आदीशक्ती आदिमाया आणि अन्नपूर्णा देवीची असलेली मंदिरे आपले लक्ष वेधून घेण्याचे काम करतात.

नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी मंदिराकडे कसे पोहचायचे

महाराष्ट्र राज्यातील साडे तीन शक्ती पीठा पैकी श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असून जवळच उस्मानाबाद व सोलापूर ही रेल्वे स्थानक आहे.

आपल्याला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page