त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी टेकड्यांच्या तळाशी आहे.
ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भगवान ब्रह्मा, विष्णू आणि भगवान रुद्र यांचे प्रतीक असलेले तीन चेहरे आहेत. हे मंदिर नाशिक शहरापासून साधारणपणे 28 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून खूप लोकप्रिय आहे, यामुळे इथे मोठ्या संख्येने भाविक दूरदूरहून येतात.
त्र्यंबकेश्वर शिव मंदिर कोणी बांधले: त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी 16 लाख रुपये इतका खर्च आला. आणि साधारणत: 31 वर्षे मंदिराचे बांधकाम सुरु होते. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे.
त्र्यंबकेश्वर दर्शन आणि पूजा वेळ: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविक दर्शनासाठी पहाटे 6.00 वाजता उघडले जाते आणि रात्री 9.00 वाजता बंद होते.
त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव: 1) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे 12 वर्षांतून एकदा कुंभमेळा असतो. जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे असतो. तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभाही होतात. अनेक विद्वान, संन्यासी, १३ आखाड्यांचे साधू, विविध पिठांचे शंकराचार्य या सोहळयाला उपस्थित राहतात.
2) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस. 3) निवृत्तीनाथ उत्सव : पौष महिन्यातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
4) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा. 5) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.
त्र्यंबकेश्वर कसे पोहोचाल: त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ आहे. हे नाशिकच्या मुख्य शहर केंद्रापासून साधारणपणे 30 किमी अंतरावर आहे. तुम्ही रोडवेवरून सहज येथे पोहोचू शकता. त्याशिवाय त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी देखील घेता येईल.
त्र्यंबकेश्वरमध्ये रेल्वे स्टेशन नाही. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे आहे मुंबई किंवा भारतातील इतर कोणत्याही शहरातून आपण नाशिक रेल्वे स्थानकात पोहोचू शकता.
यानंतर येथून त्र्यंबकेश्वरला टॅक्सी घेता येते. त्र्यंबकेश्वर पुणे व मुंबईला रस्त्याने जोडलेले आहे. या शहरांमधून राज्य परिवहन बसेस, लक्झरी बस किंवा टॅक्सीद्वारे आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता.