उन्हाळ्यात तोंडली खाल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे

प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे जुनी लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करायचे. आज आपण अशाच एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत.

भाजी बाजारात गेल्यावर बऱ्याचवेळा आपण तोंडल्याची भाजी बघितली असेल. पिकलेली तोंडली ही लाल चुटूक असतात तर कच्ची ही हिरवी असतात. ग्रामीण भागात हिरव्या तोंडल्याची भाजी केली जाते.

तोंडल्याची भाजी खाल्याने कोणकोणते आरोग्यवर्धक फायदे होऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तोंडल्याच्या भाजीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात.

तोंडाला चव नसल्यास तोंडली खाल्याने तोंडाला चव यायला मदत होते. तोंडाला आतून फोड आलेले असल्यास, तोंड आले असल्यास तोंडली खाल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो.

तोंडल्याच्या भाजीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आहारात तोंडल्याच्या समावेश केल्याने वेगवेगळ्या संसर्गापासून आपले संरक्षण होऊ शकते.

तोंडली खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकते. तोंडल्याचा आहारात समावेश केल्याने वजन कमी करता येऊ शकते. तोंडल्याच्या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

तोंडल्याचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते. तोंडली खाल्याने अपचन, गॅस, जळजळ एसीडीटी कमी व्हायला मदत होते.

आपल्याला उन्हाळ्यात तोंडली खाल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा, आपल्या भागात या भाजीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असेल तर ते नाव कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page