तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय

अन्नाचे लहान कण तोंडात राहिल्याने बऱ्याचदा आपल्या तोंडाला वास येतो? मग खरी पंचायत होते. तोंडाला वास येत असल्यामुळे आपण आपल्याला आजूबाजूला असणाऱ्यासोबत बोलताना संकोच करू लागतो. म्हणूनच आज आपण तोंडाला वास दुर्गंधी येऊ नये यासाठी अगदी सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

तोंडाला वास दुर्गंधी येऊ नये यासाठी जेवन झाल्यानंतर पाण्याने खळखळून गुळणा करायला विसरू नका; गुळणा केल्याने आपल्या दातांमध्ये अडकलेले अन्नाचे लहान लहान कण निघून जातील.

तोंडाला वास दुर्गंधी येऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यायची सवय लावा; बऱ्याचदा अन्न पचन व्यवस्थित न झाल्याने देखील तोंडाला वास दुर्गंध येतो. भरपूर पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन चांगल्याप्रकारे होईल आणि आपल्या तोंडाला वास देखील येणार नाही. याशिवाय एसीडीटीचा त्रास आपल्याला नेहमी होत असेल तर तो देखील कमी होईल.

तोंडाला वास दुर्गंधी येऊ नये यासाठी गुट’खा, तंबा’खू, धुम्रपान अशा व्यसनापासून दूर रहा. जेवण केल्यावर बडीशेप, इलायची, लवंग, पुदिन्याची पाने यापैकी आपल्याला जे जमेल ते चघळा; असे केल्याने तोंडाला वास दुर्गंधी येणे बंद होईल.

आपल्या आहारात कच्चा कांदा, लसून, मुळा अशा गोष्टी असतील तेव्हा त्यानंतर गुळणा करून एखादी इलायची चघळा आपल्या तोंडाला वास दुर्गंधी येणार नाही. आपल्याला तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page