जेवल्यानंतर अन्न दातांमध्ये अन्नाचे कण तसेच राहिल्याने तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. त्याचबरोबर पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास हि तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. तोंडाला दुर्गंध येत असल्यास लोक आपल्याशी बोलणे टाळू लागतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तोंडाला दुर्गध येत असल्यास कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो. चला तर जाणून घेऊयात.
तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी आपण जेवण केल्यानंतर बडीशेप खाऊ शकता. बडीशेप खाल्याने तोंडातील दुर्गंधी काही वेळातच दूर होते. पुदिन्याची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
पुदिना खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे रोज जेवल्यानंतर 2 ते 3 पुदिन्याची पाने खावीत. त्यामुळे मुख दुर्गंधी नाहीशी होईल आणि शरीराला अनेक पोषक घटक मिळतील.
जेवण केल्यानंतर जेवणामध्ये कांदा, लसणाचा वापर असल्यास तोंडाला दुर्गंध येतो अशा वेळी तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी एखादी वेलची चघळा. तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी जास्त पाणी प्या. पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
तोंडाला दुर्गध येऊ नये यासाठी आपण जेवण झाल्यावर 1 लवंग चघळा. लवंग खाल्याने तोंडाला येणारा घाण वास दूर होतो. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आपण बऱ्याच वेळा एखाद्या पदार्थाला सुगंध येण्यासाठी वापरतो.
तोंडाला येणारा दुर्गंध घालविण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनी चघळून खाल्याने मुख दुर्गंधी नाहीशी होईल. हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाला दुर्गंध येऊ नये यासाठी काही खाल्यानंतर चूळ भरा. सकाळ-संध्याकाळ ब्रश करा.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.