तोंडाला दुर्गंध येणे घरगुती उपाय

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलणे टाळतो. आपल्या तोंडाला दुर्गंध येतो का हे पाहण्यासाठी आपला हात तोंडासमोर धरून त्यावर जोरात फुंका जर तोंडाला दुर्गंध येत असल्यास आपल्याला लगेच कळेल. तोंडाला दुर्गंध येणे हि सामान्य समस्या आहे.

जिभेवर आणि दातांमध्ये वाढलेल्या बॅक्टेरियामुळे आपल्या तोंडाला दुर्गंध येत असतो. आपल्या जेवणात कांदा, लसून, मासे अशा गोष्टी असल्यास त्यामुळे देखील तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. आज आपण तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी आपण दालचिनीचा वापर करू शकता. दालचिनीमध्ये सिनॅमिक अल्डिहाइड नावाचा घटक असतो. जो तोंडाला येणारी दुर्गंधी दूर करण्यात मदत करतो. तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, आपण दालचिनी चहा किंवा दालचिनी पावडरच्या पाण्याने गार्गल करू शकता.

आपल्या इथे जुन्या काळापासून जेवण केल्यानंतर बडीशेप खायची परंपरा आहे बडीशेप हि चांगली माऊथ फ्रेशनर आहे. जेवण केल्यानंतर चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाला दुर्गंध येत नाही.

तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आपण जेवण केल्यानंतर गुळणा करायला विसरू नका. जेवण केल्यानंतर गुळणा केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघायला मदत मिळते. त्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी माउथवॉश केल्याने देखील तोंडाला दुर्गंध येत नाही. मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हिरड्यांवर मसाज केल्याने हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाला येणारा दुर्गंध ही कमी होते. पेरूची पाने चघळल्याने तोंडाला येणारा वास निघून जातो. तोंडाला दुर्गंध येऊ नये यासाठी दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page