तोंडाला चव नसल्यास करा हे घरगुती उपाय

आजारातून बरे झाल्यानंतर गोळ्या-औषधांच्या कडू चवीमुळे इतर कोणतेही अन्नपदार्थ खाल्यावर त्याची चव लागत नाही. अशावेळी नेमके कोणते घरगुती उपाय केल्याने तोंडाला चव येऊ शकते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

तोंडाला चव येण्यासाठी चिमुटभर ओवा चावून चघळा; अथवा चमचाभर ओव्याची पावडर पाण्यात टाकून पाणी उकळून गाळून  प्या. अगदी थोड्याच वेळात आपल्या तोंडाला चव येईल.

तोंडाला चव येण्यासाठी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्या. त्यानंतर एका भांड्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात चिरलेला लसूण घाला. आता हे पाणी काही मिनिटे उकळू द्या, नंतर कोमट होईपर्यंत असेच ठेवा. जेव्हा ते कोमट वाटू लागते तेव्हा ते गाळून चहासारखे सेवन करा. असे केल्याने तोंडाला चव येईल.

आल्यामध्ये एन्टीवायरल आणि एन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आले चघळल्याने तोंडाला चव येते. आपल्याला कोणत्याही पदार्थाचा वास येत नसल्यास देखील आपण आले चघळू शकता.

तोंडाला चव येण्यासाठी काळीमिरी आणि लवंग एकत्र करून पावडर तयार करा. जेव्हा कधी तोंडाची चव जाईल तेव्हा चिमुटभर पावडर जीभेला लावा. असे केल्याने आपल्या तोंडाला चव येईल.

आपल्याला तोंडाला चव नसल्यास करा हे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page