तोंड आल्यावर करा हे घरगुती उपाय

तोंडाच्या आतल्या बाजूने एखादा फोड येणे किंवा अल्सर होणे, याला आपण बोली भाषेत तोंड येणे असं म्हणतो. तोंड आल्यावर जेवण करणे हि अवघड होऊन जाते.

म्हणूनच आज आपण जिभेवर आणि ओठांच्या आतील बाजूस येणाऱ्या फोडांमुळे होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण तोंडाला फोड येण्याची कारणे समजून घेऊयात.

आपल्या शरीरात उष्णता वाढल्यामुळे तोंडाला आतल्याबाजूने फोड येऊ शकतात. आपल्यापैकी काही जणांना मसालेदार पदार्थ मानवत नाहीत. त्यामुळेही तोंड येऊ शकते.

दररोज रात्री जागरण केल्याने, अन्नपचन क्रिया व्यवस्थित होत नसल्यास, स्त्रियांमध्ये मा’सिक पाळीच्या दरम्यान हार्मोन मध्ये होणाऱ्या बदलांमुळे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास, शरीरात व्हिटॅमिन बी, B12 ची कमतरता असल्यास वारंवार तोंड येण्याची समस्या होऊ शकते.

तोंडाला आतल्या बाजूने फोड आले असल्यास कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या करा. दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने एक दोन दिवसातच आराम मिळेल.

तोंडाला आलेले फोड बरे होण्यासाठी आपण आपण पेरूची मध्यम आकाराची पाने चावून चघळू शकता; पेरूची पाने चघळल्याने तोंडाच्या आतल्या जखमा लवकर बऱ्या होतील.

ओले नारळाचे खोबरे चावून खाल्याने तोंडाला आलेल्या फोडांपासून आराम मिळतो. तोंड आल्यावर तुळशीच्या पाने चावून चघळल्याने देखील आराम मिळतो.

आपल्याला तोंड आल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात त्याविषयीची हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page