तिरंग्याची निर्मिती फक्त एकाच ठिकाणी होते माहित आहे कोठे?

भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांपैकी एक असलेला ‘तिरंगा’ अर्थात ‘राष्ट्रध्वज’ हा प्रत्येक भारतीयाचा गौरव आहे. राष्ट्रध्वज हा भारतीयांच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिक असून याच्या सन्मानासाठी आपल्या जवानांसह अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने देखील राष्ट्रध्वजाचा सन्मान राखायला हवा. यासाठी संविधानात नियमावली अर्थात ध्वजसंहिताही सांगण्यात आली आहे.

राष्ट्रध्वजात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढऱ्या तर खाली हिरव्या रंगाच्या एकाच आकाराच्या पट्ट्या असाव्यात. तसेच पांढऱ्या रंगामध्ये मध्यभागी गडद निळ्या रंगाचे २४ आऱ्यांचे अशोक चक्र असावे. या राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असून त्याचे प्रमाण ३ : २ असे असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज लोकरी, सुती, खादी कपड्यांमध्ये बनवले जाऊ शकतात.

राष्ट्रध्वज नेहमी स्वच्छ धुतलेला आणि व्यवस्थित इस्त्री केलाला असावा. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा खांब वाकलेल्या अवस्थेत असता कामा नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग कोणत्याही उत्सवात सजावटीसाठी करता कामा नये. जमिनीला राष्ट्रध्वजाचा स्पर्श होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही जाहीरातीत अंगावर घालण्यासाठी, नेसण्यासाठी किंवा त्याचा चादरीसारखा वापर करता येत नाही.

राष्ट्रध्वजाला फाडणे, खराब करणे किंवा जाळले जाता कामा नये. फाटलेला किंवा जुना झालेला राष्ट्रध्वज एकांतात योग्य पद्धतीने जाळून किंवा अन्य प्रकारे नष्ट केला जायला हवा. राष्ट्रध्वजाला आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली जाता कामा नये.

पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? हा राष्ट्रध्वज नक्की कोठे निर्मित केला जातो. परंतु तुम्हाला कदाचित वाचून आश्चर्य वाटेल की आपला राष्ट्रध्वज म्हणजेच आपला लाडका तिरंगा हा अधिकृत एकाच ठिकाणी तयार केला जातो. कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात बेंगेरी येथे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ देशातील सर्व राष्ट्रध्वजाची निर्मिती करते.

कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची निर्मिती १९५७ मध्ये स्थापना झाली. आणि याची निर्मिती सुरू झाली. संपूर्ण देशात केवळ या ठिकाणाहून ध्वजाचा पुरवठा होता. केवळ देशातच नव्हे तर विदेशी दुतावासात देखील या ठिकाणाहूनच पुरवठा होतो. या ध्वजाची गुणवत्ता BIS मार्फत तब्बल १८ वेळा केली जाते.

सर्वात छोटा आकार ६:४ इंच इतका आहे. ९:६ इंच, १८:१२ इंच, ५.५:३ फुट तर शहीद जवानांच्या पार्थिवासाठीच्या तिरंग्याचा आकार ६.४ फुट असतो. ९:६ फुट, १२:८ फुट तर २१:१४ फुट इतक्या वेगवेगळ्या आकारात आपल्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.

कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची निर्मिती होणाऱ्या ध्वजामध्ये वापरला जाणारा दोरा ते ध्वज निर्मित झाल्यानंतर च्या पॅकेजिंग पर्यंत २५० कर्मचारी यांच्या मार्फत काम केले जाते ज्यात महिलांचे प्रमाण सुमारे ८०% आहे.

BIS ने निश्चित तयार करण्यात आलेले रंगात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. तसेच त्याची लांबी रुंदी आणि अशोक चक्राची छपाई दोन्ही बाजूला सारखी लागते. फ्लॅग कोड ऑफ इंडिया २००२ नुसार जे नियम आहेत ते पाळावे लागतात. जर यात काही चूक झाली तर गंभीर गुन्हा मानला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page