थंडीच्या दिवसात आहारात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश करावा

थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच प्रकारचे संसर्गजन्य रोग होत असतात. हिवाळ्यामध्ये एका विशेष प्रकारचा आहार घेतल्यास आपल्याला कोणताही आजार होणार नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष प्रकारे काळजी घ्यावी लागते. शरीरामध्ये ऊर्जा टिकून ठेवणे थंडीच्या दिवसांमध्ये फार उपयुक्त असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोणत्या प्रकारच्या आहाराचा समावेश करावा हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये मिळणारे लाल गाजर अशा अनेक पौष्टिक भाज्या असतात. त्यांच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. सर्दी, खोकला, फ्यू अशा आजारांपासून या भाज्यांचा सेवनाने सुटकारा होऊ शकतो.

गरम दुधामध्ये मध घालून पिणे थंडीच्या दिवसांमध्ये फायद्याचे असते. शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी गरम दूध आणि मध फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांमध्ये दुधामध्ये साखर टाकून पिण्याऐवजी मधून टाकून प्या.

थंड पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थांचे सेवन प्रमाणात करा. सर्दी, खोकला असेल तर तेलकट पदार्थ खाणे टाळा. द्राक्ष, संत्री अशा फळांमध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. त्यामुळे त्वचेचे पोषण चांगले होते. यासाठी या फळांचा आहारात समावेश करा.

हिरव्या पालेभाज्या तसेच फळांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमधील क जीवनसत्व थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासाठी अत्यंत लाभकारक असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.

ग्रीन टीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ग्रीन टी पीने उपयुक्त ठरते. यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये ग्रीन टीच सेवन करा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page