थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ईलाज

आपल्या गळ्यात एक फुलपाखराच्या आकारासारखी थायरॉइड ग्रंथी असते. आपल्या शरीराला लागणारे हार्मोन्स तयार करण्याचे काम थायरॉइड ग्रंथी करत असतात. आपल्या आहारात आयोडीनची कमतरता असल्यास, मानसीक तणावामुळे, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे, अनुवांशिक कारणांमुळे हार्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर थायरॉइडची समस्या निर्माण होते.

आता आपण थायरॉईड आजाराची लक्षणे जाणून घेऊयात. अचानक वजन वाढणे अथवा अचानक वजन कमी होणे, केस गळणे, अत्याधिक थकवा येणे, चिडचिड होणे, मासिकपाळी वेळेवर न येणे, झोप न लागणे, अशक्तपणा अशी थायरॉईड विकार असल्यास दिसून येतात.

आता आपण थायरॉईड विकार नियंत्रणात राहण्यासाठी घरगुती उपाय समजून घेऊयात. थायरॉईड विकार नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करा.

अपल सायडर व्हिनेगर एक चमचा कोमट पाण्यासोबत प्यायल्याने हार्मोन संतुलन व्हायला मदत मिळते. दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात चालण्याची सवय लावा.

आपल्या शरीरातील हार्मोन संतुलन होण्यासाठी नारळाचे तेल, नारळाचे पाणी, खोबरे यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा. वेळेवर जेवण करण्याची सवय स्वताला लावा; आहारात हिरव्या पालेभाज्या, सलाड, ताजी फळे, कडधान्ये, सुकामेवा यांचा समावेश करा.

गायीचे दुध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा आहारात समावेश करा. रात्री कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या. ताणतणाव कमी होण्यासाठी ध्यानधारणा करणे, योगा करणे, वाचन करणे अशा सवयी स्वताला लावा.

आपल्या शरीराला आयोडीन मिळण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा. भिजवलेले बदाम खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम या घटकांमुळे थायरॉईड संतुलन व्हायला मदत मिळते.

आपल्याला थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरु करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page