थायरॉईड विकार असल्यास कोणकोणती पथ्य असतात? हायपोथायरायडिझम असल्यास काय खाव काय खावू नये?

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमित आरोग्याविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो ती माहिती आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करू शकता.

या आधीच्या लेखामध्ये आपण थायरॉईड विकार कोणकोणते असतात, त्याची लक्षणे काय असतात हि सगळी माहिती घेतली आहे; आज आपण थायरॉईड विकार असल्यास आपण कोण कोणती पथ्य पाळली पाहिजे हे जाणून घेणार आहोत. (आपल्याला जर ती माहिती परत एकदा वाचायची असेल तर कमेंटमध्ये आम्हाला तसे सांगा.)

जेव्हा आपल्या शरीरामध्ये पुरेश्या प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार होत नाही अशा स्थितीला हायपोथायरायडिझम असे म्हणतात. हायपोथायरायडिझम त्रास होत असल्यास अशक्तपणा येतो, केस गळतात, वजन वाढत, थंडी वाजून येते.

हायपोथायरायडिझमचा त्रास असल्यास शरीरातील थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण पुढील काही गोष्टी करू शकता. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, वेगवेगळी हंगामी फळे, दुध, तीळ अशा गोष्टींचा समावेश करा.

आपल्या आहारात आयोडीनयुक्त मीठाचा वापर आपण करू शकता. आयोडीन शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवायला मदत करते; आणि रक्तप्रवाह सुरुळीत ठेवण्याचं काम करतं.

थायरॉइड विकार असल्यास पोषक आहारासोबत पुरेसे पाणी प्या, रात्री सहा ते आठ तास झोप घ्या, मानसीक तणाव घेऊ नका शारीरिक कसरतीचा व्यायाम करा. निरोगी राहण्यासाठी ह्या गोष्टी करणे खूप गरजेच आहे.

थायरॉइड विकार असल्यास आहारात तेलकट, मसालेदार, अतिगोड पदार्थ, कॉफी, चरबी वाढवणारे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट अशा गोष्टी खाणे थांबवावे लागेल. ( कोबी, पालक, रताळी, सोयाबीन, शेंगदाणे अशा गोष्टी खाणे सुद्धा टाळा.

आपल्याला थायरॉईड विकार असल्यास कोणकोणती पथ्य असतात? हायपोथायरायडिझम असल्यास काय खाव काय खावू नये? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page