आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम सारखे थायरॉईड संबंधित आजार होत असतात. आपण या आधीच्या लेखांमध्ये थायरॉईड विकार लक्षणे, कारणे, पथ्य जाणून घेतले आहेत म्हणूनच आता आपण थायरॉईड विकारांवर प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
आपल्या आहारात आयोडीनयुक्त मिठाचा वापर केल्याने थायरॉईड ग्रंथींवर परिणाम होऊन थायरॉईड विकार नियंत्रणात येऊ शकतात. रात्री झोपायच्या 30 मिनिटे आधी एक चमचा अश्वगंधा पावडर गावठी गाईच्या कोमट दुधात मिसळून काही दिवस घेतल्याने थायरॉईड विकार नियंत्रणात यायला मदत मिळते.
रात्री 2 चमचे धने एक ग्लास पाण्यात भिजायला ठेवा सकाळी ते पाणी गाळून प्या. हा उपाय केल्याने थायरॉईड विकार कमी व्हायला मदत मिळते. आहारात नारळाच्या तेलाचा वापर केल्याने थायरॉईड विकार कमी व्हायला मदत मिळते.
ह्या घरगुती उपायांसोबतच आपल्याला थायरॉईड विकार नियंत्रणात आणायचे असतील तर थोडे शारीरिक परिश्रम देखील करावे लागतील. स्वताला चांगल्या सवयी लावाव्या लागतील.
आपल्या आहारात दूध आणि दही, गाजर हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असुद्या. दररोज पुरेसे पाणी प्यायची सवय लावा. रात्रीचे जागरण करू नका. जेवणाच्या वेळा पाळा.
थायरॉईड विकार नियंत्रणात येण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून चालायला जायची सवय लावा नियमित कमीत कमी 30 मिनिटे चाला. त्यानंतर ताणतणाव कमी होण्यासाठी मन शांतीसाठी ध्यानधारणा करा.
सकाळी चालायला जमले नाही तर दोरी उड्या मारा, पोहायला जा, सायकलिंग करा, शारीरिक व्यायाम करा, योगा करा. ह्या गोष्टी करायला सुरुवात केल्यावर आपल्याला नक्कीच स्वतामध्ये फरक दिसून येईल.
आपल्याला थायरॉईड विकारांवर प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.