महिलांना थायरॉईड आजार होण्याची शक्यता जास्त असते. थायरॉईड आजाराचे हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड असे दोन प्रकार असतात. थायरॉईड आजार होण्याआधी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. हि लक्षणे दिसू लागल्यावर आपण वेळीच त्यावर उपचार केल्यास आपण स्वताला थायरॉईड आजारापासून वाचवू शकता.
खाली दिलेली लक्षणे आपल्याला दिसू लागली असल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईड चाचणी करू शकता आणि वेळीच त्यावर उपचार करू शकता. चला तर जाणून घेऊयात थायरॉईड आजार होण्याआधी आपल्या शरीरात कोणकोणती लक्षणे दिसू शकतात.
हायपरथायरॉईड आजार होण्याआधी आपले वजन कमी होऊ लागते. रात्री झोप लागत नाही, हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागतात आणि चक्कर येऊ लागते. हायपर थायरॉईड आजार होण्याआधी आपला घसा कोरडा पडतो. अचानक अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो.
आता आपण हायपोथायरॉईड आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे जाणून घेऊयात. हायपोथायरॉईड आजार होण्याआधी आपले वजन वाढू लागते. हायपो थायरॉईड आजारामध्ये आपल्याला कायमच सुस्ती आल्यासारखे वाटते.
आपल्या स्नायू आणि सांध्यामध्ये वेदना होतात, चालताना थकवा येतो. घशात जडपणा जाणवायला लागतो. आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. पोट व्यवस्थित साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास व्हायला लागतो. त्वचा कोरडी पडते, मासिक पाळी उशिरा येते.
हायपर थायरॉईड हा हायपो थायरॉईडपेक्षा जास्त घातक मानला जातो. कारण जेव्हा असे होते तेव्हा वजन कमी व्हायला लागते आणि शरीर कमकुवत होते. थायरॉईडचा आजार झाल्यावर त्यावर वेळीच उपचार केल्यास थायरॉईड आजारापासून आराम मिळू शकतो.
आपल्याला थायरॉईड आजार होण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.