एका जागेवर बसून काम असल्याने आपल्या आहारात तेलकट, मैद्याचे पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असल्यावर आपले वजन वाढायला लागते. आपल्या रोजच्या आहारात फास्टफूड चे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण रोज घेत असलेल्या आहारामधून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नाहीत आपल्या शरीरात हार्मोन असंतुलन होते.
हार्मोन असंतुलन झाल्यामुळे महिलांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आज आपण आपल्या शरीरातील हार्मोन संतुलन होण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
आपल्याला शेवग्याचे झाड माहित असलेच शेवग्याच्या शेंगाची भाजी देखील आपण आवडीने खाल्ली असेल आज आपण शेवग्याच्या पानांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून घेणार आहोत.
शेवग्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, अमीनो एसिड, फायबर, कॅल्शियम, लोह आणि थायामिन यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.
शरीरातील हार्मोन संतुलन होण्यासाठी शेवग्याची अंदाजे 50 ग्राम पाने एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी मिसळून चांगले उकळवून गार करून घ्या. त्यानंतर रिकाम्यापोटी हे पाणी प्यायचे आहे. हा उपाय साधारणपणे 21 दिवस केल्याने आपल्या शरीरातील हार्मोन संतुलन होऊन वजन कमी होईल. थायरॉईड विकार नियंत्रणात येईल.
डायबेटीस असणाऱ्यांनी शेवग्याच्या पानाचा रस प्यायल्यास त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित व्हायला मदत मिळते. आपल्याला थायरॉईड, हार्मोन असंतुलन आजारावर जबरदस्त उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.